शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ४७ हजार विहिरींच्या सिंचनाचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:06 IST

विहिरींना पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देतानाच पूर्ण झालेल्या विहिरींची सद्यस्थिती तपासण्याचाही आदेश शासनाने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आत्महत्याग्रस्त विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहिरी योजनेतून मंजूर ६६ हजार विहिरींपैकी पूर्ण झालेल्या ४७ हजार १०० विहिरींची सद्यस्थिती काय आहे, त्यातून सिंचन होत आहे का, सिंचनात किती वाढ झाली, या मुद्यांच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांकडून त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती केली जाणार आहे. नियोजन विभागाने ७ नोव्हेंबर रोजीच्या आदेशात लेखापरीक्षण करण्याचे म्हटले आहे.विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील ६६ तालुक्यांमध्ये धडक सिंचन विहीर योजनेतून प्रत्येकी १ हजार विहिरींना २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सर्वच योजनांतील म्हणजे, जवाहर विहिरी, धडक सिंचन विहिरी, नरेगातून धडक सिंचन योजनेत घेण्यात आलेल्या विहिरींचाही समावेश करण्यात आला. त्या विहिरींची अंमलबजावणी करताना ४७,०९१ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. एकूण विहिरींपैकी ८,००७ विहिरी रद्दही झाल्या. त्यापैकी २,९८५ विहिरींना पुनर्जीवित करण्याला मंजुरी देण्यात आला. त्या विहिरींना पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ देतानाच पूर्ण झालेल्या विहिरींची सद्यस्थिती तपासण्याचाही आदेश शासनाने दिला आहे.आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाभार्थींनी पूर्ण केलेल्या विहिरींना प्रत्यक्ष भेट दिली जाणार आहे. त्यासाठी अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातही त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती करावी लागणार आहे. त्या यंत्रणेकडून विहिरींचे लेखापरीक्षण केले जाईल.पूर्ण झालेल्या ४७,०९१ विहिरींची सद्यस्थिती काय आहे, त्यापैकी किती विहिरींचा वापर सुरू आहे, त्या विहिरींमुळे सिंचनात किती वाढ झाली, या बाबींची माहिती लेखा परीक्षणात नमूद केली जाणार आहे. त्यामुळे आता सिंचन विहीर लाभार्थींच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन विहीरींची पाहणी केली जाणार आहे.विभागीय आयुक्त नेमतील पथकेसहा जिल्ह्यांमध्ये विहिरींची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लेखा परीक्षणाची जबाबदारी अमरावती व नागपूर विभागीय आयुक्तांवर टाकण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती झाल्यानंतर विहिरींना भेटीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला