शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

औटघटकेच्या सुवर्णपदकाने दानापूरची ‘आर्ची’ प्रकाशझोतात!

By admin | Updated: July 11, 2017 01:28 IST

अकोला : भुवनेश्वर येथे सध्या बाविसावी एशियन एथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत दानापूरची आंतरराष्ट्रीय धावपटू अर्चना अढाव हिने सुवर्णपदक पटकवले; मात्र तिच्या यशाचा हा आनंद औटघटकेचाच ठरला.

नीलिमा शिंगणे-जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अर्चना रामदास अढाव. काहीसे अनोळखी असलेले हे नाव कालपासून देशभरात चर्चेत आहे. ही चर्चा आहे यश आणि नियतीच्या एका फेऱ्याची. भुवनेश्वर येथे सध्या बाविसावी एशियन एथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील ८०० मीटर धावण्याची स्पर्धा होती. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दानापूरची आंतरराष्ट्रीय धावपटू अर्चना अढाव हिने सुवर्णपदक पटकवले होते; मात्र तिच्या यशाचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, श्रीलंकन धावपटू निमाली वालीवर्षा कोंडा हिने अर्चनाने तिला धक्का मारल्याची तक्रार स्पर्धेच्या ज्युरीकडे केली. ज्युरीने ही तक्रार मान्य करीत दुसऱ्या क्रमांकावरील निमालीला सुवर्णपदक बहाल करण्याचा निर्णय दिला. तिच्या यशाने संपूर्ण स्टेडियमसह दानापूरसह संपूर्ण अकोला जिल्हाही न्हाऊन निघाला होता; मात्र नंतरच्या घटनेने यावर काहीसे विरजण पडले. दरम्यान, या घटनेने तिचे गाव दानापूरसह संपूर्ण अकोला जिल्हा हिरमुसला.एथलेटिक्सच्या जगात अलीकडे अर्चनाने आपल्या वेगाने ‘तेल्हारा- एक्स्प्रेस’ नावाने संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. मुळात अर्चनाचा दानापूर ते एशियन एथलेटिक्स स्पर्धेपर्यंतचा हा प्रवास अनेक आव्हाने आणि खाचखळग्यांनी भरलेला. १९९७ मध्ये अर्चना तीन महिन्यांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. अर्चनाला तिच्यासह आणखी दोन बहिणी. तिच्या आईने आपले सासू-सासरे आणि दिरांच्या मदतीने कुटुंबाचा गाडा हाकलायचा प्रयत्न केला. पहिली ते सातवीपर्यंतचे अर्चनाचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर आठवा वर्ग ती गावातीलच हनुमानप्रसादसाह जनता विद्यालयात शिकली. याच ठिकाणी तिच्या आयुष्याला पैलू पाडणारे तिचे क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक नितीन मंगळे तिला भेटले. तिच्यातील प्रतिभा आणि ध्येयाला मंगळे सरांनी वाट करून दिली. अन् येथूनच राष्ट्रीय स्तरावर धावणे आणि लांब उडीत तिने नैपुण्य दाखवायला सुरुवात केली. यामुळेच २०१२ मध्ये तिची निवड पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडाप्रबोधिनीत झाली अन् तिचा पुढचा प्रवास सुरू झाला. तिच्या प्रशिक्षकांना तिच्या या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे.अर्चना ही आई ताई अढाव यांच्यासह पुण्यात असते. तर तिचे आजी-आजोबा आणि काका दानापुरात शेती करतात. क्रीडाप्रबोधिनीत जायला आधी विरोध करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांचा उर अर्चनाच्या कामगिरीने भरून आला. अर्चना भुवनेश्वरवरू न थेट हिमाचल येथे सुरू असलेल्या सराव शिबिराकरिता रवाना होणार असल्याचे ताई अढाव यांनी लोकमतजवळ सांगितले.