स्थायी समितीचे सभापती संजय बडाेणे यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता ऑनलाइन प्रणालीद्वारे सभेचे आयाेजन केले हाेते. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर नवीन विद्युत खांब उभारून प्रकाशमान एलईडी पथदिवे लावण्यात आले. मनपा कार्यालयात शासनाच्या ऊर्जा बचतीच्या धोरणांतर्गत जुने पंखे, ट्युबलाइट, एसी आदी काढून त्या जागी ऊर्जा बचत करणाऱ्या विद्युत साहित्यासाठी निधी दिला होता. प्राप्त निधीतून नवीन साहित्य लावण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने जुन्या साहित्याचा लिलाव करण्यासाठी सूचना प्रसिद्ध केली हाेती. १८ जून रोजी लिलाव सूचनेत ४१ जणांनी भाग घेतला. या लिलावात मनपा कार्यालयातील जुने साहित्य ५ लाख १ हजार रुपयांना देण्यात आले. यांसह शहरातील जुन्या विद्युत साहित्याचादेखील समावेश हाेता. सदर प्रस्ताव स्थायीसमाेर सादर केला असता, भाजपचे सतीश ढगे, काँग्रेसचे माेहम्मद इरफान यांनी मत व्यक्त केले. चर्चेअंती हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
नगरसेवकांचे आक्षेप; सोमवारी बैठक
पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे, इरफान खान, आशिष पवित्रकार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ही बाब पाहता सभापती संजय बडोणे यांनी १९ जुलै राेजी सोमवारी जलप्रदाय विभागाची आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
नेकलेस, टिळक राेडवर लावणार एलईडी
नगराेत्थान निधी अंतर्गत ४१ लाख रुपयांतून नेकलेस व टिळक राेडवरील दुभाजकांमध्ये एलईडी पथदिवे लावण्यासाठी न्यू मयूर इलेक्ट्रिकल्सची १८ टक्के कमी दराने निविदा प्राप्त झाली हाेती. ही निविदा मंजूर करण्यात आली. लवकरच या दाेन्ही रस्त्यांवर पथदिवे उभारणीचे काम सुरू हाेणार आहे.