शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 13:26 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत ते शासनाने स्वत:कडे तर काही इतर विभागाकडे देण्याचा सपाटा लावला आहे.

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत ते शासनाने स्वत:कडे तर काही इतर विभागाकडे देण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायत राज संस्थांच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता वाढत आहे. विशेष म्हणजे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी झालेल्या ७३ व्या घटनादुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षात हा प्रकार घडत आहे.‘बळकट पंचायती राज व्यवस्थेमार्फत ग्रामीण विकास’, असे ध्येय असलेल्या ग्रामविकास विभागाने गेल्या काही वर्षांत पंचायती राज व्यवस्थेत शीर्षसंस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवरच गदा आणली आहे. देशातील पंचायत राज संस्थांना अधिक अधिकार मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरुस्ती केली. राज्याकडील अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे, तेच अधिकार जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना मिळावे, हा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. यानुसार राज्यांकडील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय तेही अंशत: जिल्हा परिषदांना देण्यात आले. त्यापैकीही काही अधिकार हळूहळू पुन्हा सरकार परत घेत आहे. विशेष म्हणजे, चालू वर्ष ७३ व्या घटनादुरुस्तीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरस्तीनुसार सर्व अधिकार मिळतील, या आशेवर असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना उलट अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे.पंचायती राज व्यवस्थेतून ग्रामविकास आणि तळागाळातील जनतेला राजकीय सत्तेत भागीदारी मिळावी, यासाठी या व्यवस्थेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये सत्तांतर झालेल्या सरकारने सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या अस्तित्वाला नख लावणारे निर्णय घेणे सुरू केले आहे.

 कृषी विभाग उरला सेसफंडापुरता!जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेले कृषी सेवा केंद्र परवाने, बियाणे विक्री परवाना, कीटकनाशक विक्री, साठा परवाना, कृषी अभियांत्रिकी योजना राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्या, तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत बळकटीकरण ही योजनाही हस्तांतरित झाली आहे.

  रस्ते निर्मिती, पदभरती, शिक्षक बदल्याही शासनाकडेजिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला. पदभरती शासन करणार, तर शिक्षकांच्या बदल्याही शासन स्तरावरूनच होत आहेत. वस्तू खरेदीसाठी ठरावीक कंत्राटदारांची निवड करून त्यांच्याकडूनच खरेदीचे बंधनही घालण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद