शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला करून गुरे पळवली; दोघांना अटक

By admin | Updated: July 11, 2017 01:38 IST

हिवरखेडजवळील घटना; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड: गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या हिवरखेड पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला करून गुरे पळवून नेली. ही घटना हिवरखेडजवळ १० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा जंगलातून अवैधपणे गुरे हिवरखेड येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांवर पाळत ठेवली. सकाळी ९.३० वाजता दोन वाहनांमध्ये गुरे येत असल्याचे दिसताच ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या पथकाने ही वाहने अडवली. त्यांची तपासणी केली असता वाहन क्र.एमएच ३० एबी ४२०२ यामध्ये तीन बैल तर वाहन क्र.एमएच ३० एबी १९८२ मध्ये पाच बैल असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांना बैलांच्या खरेदीविषयी कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे आढळली नाहीत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची माहिती हिवरखेड येथील काही लोकांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.तसेच पोलिसांबरोबर धक्काबुक्की केली व दुसऱ्या वाहनातील पाच बैल पळवून नेले. अचनाक घडलेल्या घटनेमुळे पोलिसही गोंधळून गेले होते. या प्रकरणी हेकॉ नंदू सुलताने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी अ. शरीफ अ. लतीफ रा. धुलघाट, शे. रईस इक्रमोद्दीन यांच्यासह १५ जणांविरुद्ध भादंवि १४३, ३५३, ३३२, १८६, १२०ब, ५ (५ अ), ९, ९(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम, नंदू सुलताने, नीलेश तायडे, राजू इंगळे, अमोल पवार करीत आहेत.