शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: April 30, 2017 19:42 IST

हिवरखेड : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हिवरखेड : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पिंप्री खुर्द येथील पीडित महिला २००० मध्ये आठव्या वर्गात शिकत होती. तिला सावत्र आई-वडील होते. तेव्हा गावातीलच तिच्या नात्यातील संजय प्रल्हाद खंडारे याला नोकरीवर लावण्यासाठी त्याच्या आईने सदर मुलीच्या आजोबाकडून २० हजार रुपये उसने मागितले होते. त्या बदल्यात संजयची आई सरस्वती हिने संजय याचे लग्न पीडीत मुलीसोबत लावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर लग्न लावणार असे आमिष सतत दाखवून संजय खंडारेने सदर मुलीचे शारीरिक शोषण केले. नंतर सदर मुलीचे लग्न दुसऱ्या युवकासोबत झाले. ती विवाहित महिला हिवाळ्यात व उन्हाळ्यात माहेरी पिंप्री खुर्द येथे आली म्हणजे संजय खंडारे तिला धमकावून तिचे शारीरिक शोषण करावयाचा. त्या धास्तीने सदर महिला पिंप्री येथील तिच्या माहेरी येतच नव्हती. अशाच प्रकारे २९ एप्रिलपूर्वी सदर महिलेने तिच्या मुलींना सतत नकार दिल्यानंतर पतीने माहेरी न जाण्याचे कारण विचारले असता तिने उपरोक्त घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात आरोपी संजय याला त्याची आई सरस्वती व भाऊ प्रमोद हे दोघेही मदत करावयाचे. अखेर सदर महिलेने २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय प्रल्हाद खंडारे, सरस्वती प्रल्हाद खंडारे व प्रमोद प्रल्हाद खंडारे अशा तिघांविरुद्ध भादंवि ३७६, ४५२, ४१७, ५०६, ३४ सहकलम ३, ४, १६, १७ बालकांचे लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय खंडारे याला तत्काळ अटक केली. पुढील तपास एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार शरद भस्मे, गोपाल दातीर, गीतेश कांबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)