शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: May 1, 2017 03:12 IST

हिवरखेड : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हिवरखेड : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पिंप्री खुर्द येथील पीडित महिला २००० मध्ये आठव्या वर्गात शिकत होती. तिला सावत्र आई-वडील होते. तेव्हा गावातीलच तिच्या नात्यातील संजय प्रल्हाद खंडारे याला नोकरीवर लावण्यासाठी त्याच्या आईने सदर मुलीच्या आजोबाकडून २० हजार रुपये उसने मागितले होते. त्या बदल्यात संजयची आई सरस्वती हिने संजय याचे लग्न पीडीत मुलीसोबत लावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर लग्न लावणार असे आमिष सतत दाखवून संजय खंडारेने सदर मुलीचे शारीरिक शोषण केले. नंतर सदर मुलीचे लग्न दुसऱ्या युवकासोबत झाले. ती विवाहित महिला हिवाळ्यात व उन्हाळ्यात माहेरी पिंप्री खुर्द येथे आली म्हणजे संजय खंडारे तिला धमकावून तिचे शारीरिक शोषण करावयाचा. त्या धास्तीने सदर महिला पिंप्री येथील तिच्या माहेरी येतच नव्हती. अशाच प्रकारे २९ एप्रिलपूर्वी सदर महिलेने तिच्या मुलींना सतत नकार दिल्यानंतर पतीने माहेरी न जाण्याचे कारण विचारले असता तिने उपरोक्त घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात आरोपी संजय याला त्याची आई सरस्वती व भाऊ प्रमोद हे दोघेही मदत करावयाचे. अखेर सदर महिलेने २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय प्रल्हाद खंडारे, सरस्वती प्रल्हाद खंडारे व प्रमोद प्रल्हाद खंडारे अशा तिघांविरुद्ध भादंवि ३७६, ४५२, ४१७, ५०६, ३४ सहकलम ३, ४, १६, १७ बालकांचे लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय खंडारे याला तत्काळ अटक केली. पुढील तपास एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार शरद भस्मे, गोपाल दातीर, गीतेश कांबळे करीत आहेत.