शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: May 1, 2017 02:44 IST

अकोला : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अकोला : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पिंप्री खुर्द येथील पीडित महिला २००० मध्ये आठव्या वर्गात शिकत होती. तिला सावत्र आई-वडील होते. तेव्हा गावातीलच तिच्या नात्यातील संजय प्रल्हाद खंडारे याला नोकरीवर लावण्यासाठी त्याच्या आईने सदर मुलीच्या आजोबाकडून २० हजार रुपये उसने मागितले होते. त्या बदल्यात संजयची आई सरस्वती हिने संजय याचे लग्न पीडीत मुलीसोबत लावण्याचे आमिष दाखविले.त्यानंतर लग्न लावणार असे आमिष सतत दाखवून संजय खंडारेने सदर मुलीचे शारीरिक शोषण केले. नंतर सदर मुलीचे लग्न दुसऱ्या युवकासोबत झाले. ती विवाहित महिला हिवाळ्यात व उन्हाळ्यात माहेरी पिंप्री खुर्द येथे आली म्हणजे संजय खंडारे तिला धमकावून तिचे शारीरिक शोषण करावयाचा. त्या धास्तीने सदर महिला पिंप्री येथील तिच्या माहेरी येतच नव्हती. अशाच प्रकारे २९ एप्रिलपूर्वी सदर महिलेने तिच्या मुलींना सतत नकार दिल्यानंतर पतीने माहेरी न जाण्याचे कारण विचारले असता तिने उपरोक्त घटनाक्रम सांगितला. अखेर सदर महिलेने २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय प्रल्हाद खंडारे, सरस्वती प्रल्हाद खंडारे व प्रमोद प्रल्हाद खंडारे अशा तिघांविरुद्ध भादंवि ३७६, ४५२, ४१७, ५०६, ३४ सहकलम ३, ४, १६, १७ बालकांचे लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय खंडारे याला तत्काळ अटक केली. पुढील तपास एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार शरद भस्मे, गोपाल दातीर, गीतेश कांबळे करीत आहेत.