अकोला : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली रोखतेची समस्या अजूनही पूर्णपणे मार्गी न लागल्यामुळे काही अपवाद वगळता शहरास जिल्हय़ातील बहुतांश सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएममधील पैशांचा ठणठणाट कायमच आहे. खात्यांमध्ये पैसे असतानाही एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शहरासह जिल्हय़ात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची ५00 वर एटीएम आहेत. नोव्हेंबर महिन्यात केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच एटीएम बंद पडले होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्वच एटीएम सुरू होऊन पैशांची चणचणही राहिली नव्हती. गत महिनाभरापासून मात्र शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट आहे. रिझर्व्ह बँकेकडून जिल्हय़ाच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात रोकड मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बँकांच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. सध्या शहरातील बहुतांश एटीएम रिकामे आहेत. काही एटीएम मशीन सुरू राहत असल्या, तरी त्यात नोटा नसल्याने नागरिकांना आल्या पावली मागे फिरावे लागत आहे. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील ह्यएटीएमह्ण व खासगी बँकेच्या एक ते दोन एटीएमचा अपवाद वगळता शहरातील बहुतांश एटीएममध्ये दररोजच ठणठणाट पाहावयास मिळत आहे. बँकांचाही आखडता हात एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिक बँकांकडे वळले आहेत; परंतु बँकांमध्येही पैसे काढणार्यांच्या मोठय़ा रांगा कायमच लागलेल्या असतात. हव्या त्या प्रमाणात रोकड प्राप्त होत नसल्यामुळे बँकाही आखडता हात घेत आहेत. खातेदारांना पाच ते दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम दिल्या जात नसल्याचे चित्र अनेक बँकांमध्ये पाहावयास मिळत आहे. आपलेच पैसे आपल्या कामात पडत नसल्याच्या भावना बँक ग्राहक बोलून दाखवत आहेत.
‘एटीएम’ रिकामेच; पैशांसाठी नागरिकांची पायपीट
By admin | Updated: May 9, 2017 19:43 IST