शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यक पशुधन विकास अधिका-याने उपचारासाठी केली पैशांची मागणी

By admin | Updated: October 2, 2015 02:19 IST

महानचे ग्रामस्थ संतप्त; दवाखान्याच्या आवारात अडीच तास चालला गोंधळ.

महान (जि. अकोला) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत साहाय्यक पशुधन विकास अधिकार्‍याने एका पशुपालकाकडे उपचार करण्यासाठी लागणार्‍या औषधीकरिता ५00 रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे, तर याप्रकारामुळे संतत्प झालेल्या ग्रामस्थांशीही हुज्जत घातल्याचा प्रकार गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी येथे घडला. स्थानिक पशुपालक पुरुषोत्तम दत्तात्रय भडांगे हे गुरुवारी सकाळी त्यांच्या मालकीच्या म्हशीवर उपचार करवून घेण्यासाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले. तेथे कार्यरत असलेले साहाय्यक पशुधन विकास अधिकार्‍याने म्हशीवर उपचार केले नाहीत. त्यांनी म्हशीवर उपचारासाठी लागणार्‍या औषधांसाठी ५00 रुपये देण्याची मागणी केली, अशी माहिती पुरुषोत्तम भडांगे यांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना दिली. त्यामुळे संतप्त झालेले सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ सकाळी ११.३0 वाजता याबाबत विचारण्यासाठी भडांगेसोबत पशुवैद्यकीय दवाखान्यात पोहोचले. तेव्हा सदर अधिकारी दवाखान्यात अंडरवियरवर झोपले होते. त्यामुळे आलेल्या लोकांनी त्यांना उठविले असता ते तंद्रीतच असल्याचे जाणवले. ते पॅन्ट घालून बनियानवरच खुर्चीत येऊन बसले. झालेल्या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी कधी दवाखान्यात औषधी उपलब्ध नाही, तर कधी त्यांना नोकरीची गरज नाही, अशी उत्तरे दिली. तसेच अज्ञात अधिकार्‍यांना मोबाइलवरून कॉल करून हे लोक मला मारायला आले, असे सांगितले. यावेळी लोकांनी त्यांची समजूत काढण्याचा व त्यांनी पशुपालकाला काय म्हटले व कां म्हटले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते माझी कुठे तक्रार करायची ती करा. मी कायमस्वरूपी डॉक्टर नाही, माझ्याकडे महान गावाचा प्रभार दिला गेला आहे, अशी उत्तरे देत होते. हा गोंधळ तब्बल अडीच तासपर्यंत चालला. अखेर जमावातील जबाबदार लोकांनी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्‍यांना झालेल्या प्रकार कळविला. तसेच याबाबत महान पोलीस चौकीतील अधिकार्‍याला फोन करून माहिती दिली. त्यावेळी सदर अधिकार्‍याने पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप लावले. त्यानंतर पशुपालक पुरुषोत्तम भडांगे याबाबतची तक्रार बाश्रीटाकळी पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकार्‍यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.