शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाटपात हेक्टरी मर्यादेत दुजाभाव

By admin | Updated: January 23, 2015 02:19 IST

दुष्काळग्रस्त बहुभूधारक शेतक-यांवर अन्याय.

संतोष येलकर / अकोला:दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीमध्ये अल्प, अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंत, तर दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादन करणार्‍या बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंतच मदत दिली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाले असताना, मदत वाटपात हेक्टरी र्मयादेच्या नावाखाली दुजाभाव आणि बहुभूधारक शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना मदत निधीचे वितरण केले असून, ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येत असलेल्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील सर्वच शेतकर्‍यांचे पिके हातून गेल्याने नुकसान झाले. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अल्प,अत्यल्प भूधारक शेतकरी असो की बहुभूधारक, या सर्वच शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळग्रस्त सर्वच शेतकर्‍यांकरिता मदत वाटपासाठी शेती क्षेत्राची सारखीच र्मयादा असायला हवी; मात्र सरकारकडून वाटप करण्यात येत असलेल्या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत, तर बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंतच मदत वाटप केली जात आहे. सरकारी मदतीत हेक्टरी र्मयादेचा दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी केला आहे.जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे यांनी दुष्काळी परिस्थितीत सर्वच शेतकरी नुकसान झेलत आहेत; परंतु सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदत दिली जात आहे. हेक्टरी र्मयादेत शेतकर्‍यांना मदत वाटपातील हा भेदभाव दूर सारून समान हेक्टरी र्मयादेनुसार मदतीचे वाटप करण्याची मागणी केली.