शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांची माहिती संकलितच होईना!

By admin | Updated: February 9, 2016 02:21 IST

मोजणी शिटवरील माहितीमुळे ऑपरेटरचा गोंधळ; मनपासमोर कर वाढीचे संकट.

अकोला: पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्तांची माहिती संगणकीकृत करताना ह्यडाटा एन्ट्री ऑपरेटरह्णपुढे अनेक अडचणी येत असून, मोजणी शिटवर अचूक माहितीचा अभाव असल्यामुळे अचून माहिती नोंदविताना संगणक परिचालकांचा गोंधळ उडत आहे. या पृष्ठभूमीवर ही माहिती संगणकीकृत करताना दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. तत्कालीन अधिकार्‍यांच्या हेकेखोरपणाचा फटका महापालिका प्रशासनाला बसत असून, कर वाढ करण्याशिवाय दूसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही. महापालिकेच्या उत्पन्नात १२0 कोटींनी वाढ होईल, असा गवगवा करीत मालमत्तांचे नव्याने पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय तत्कालीन अधिकार्‍यांनी घेतला होता. संबंधित अधिकार्‍यांनी मालमत्ता कर विभागाच्या मदतीने एप्रिल २0१५ मध्ये पुनर्मूल्यांकन मोहिमेला सुरुवात केली. कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय भर उन्हाळ्य़ात ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मालमत्ता विभागाचे वसुली निरीक्षक, नगर रचना-बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता यांच्यासह महापालिका शिक्षकांनादेखील जुंपण्यात आले होते. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच या मोहिमेसाठी ५00 कर्मचार्‍यांचा फौजफाटा वापरण्यात आला. पहिल्या टप्प्यात दक्षिण झोन व त्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार झोननिहाय मोजणी करण्यात आली. दक्षिण झोनमधील मोजणी पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ गृहीत धरणे अपेक्षित होते. तसे न करता केवळ मालमत्तांची मोजणी करण्यात आली. अर्थातच ही चूक कागदोपत्री कायम असल्याची माहिती आहे. अप्रशिक्षित शिक्षक, सुरक्षा रक्षकांकडून ही मोजणी झाली असून, मोजणी शिटवरील माहिती अचूक नाही. मालमत्तांच्या नोंदी करण्यास दिरंगाई झाली असून, मनपाने नियुक्त केलेल्या २0 डाटा एन्ट्री ऑपरेटरला ९0 हजार मालमत्तांची माहिती संकलित करताना प्रशासनाच्या चुकीमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे