शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

जमीन एकत्रीकरणासाठी शासनाला मार्गदर्शन मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:05 IST

अकोला : गावातील ७५ टक्के खातेदारांनी मागणी केल्यास जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यासाठी ग्रामसभांचे ठराव मागवण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने केली; मात्र त्यासाठी पंचायत विभागाने कोणताही पाठपुरावा न केल्याने शासनाची योजना कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला.

अकोला : गावातील ७५ टक्के खातेदारांनी मागणी केल्यास जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यासाठी ग्रामसभांचे ठराव मागवण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने केली; मात्र त्यासाठी पंचायत विभागाने कोणताही पाठपुरावा न केल्याने शासनाची योजना कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला. त्यानंतर आता या कायद्याची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत शासनाकडूनच मार्गदर्शन मागवण्याची तयारी पंचायत विभागाने केली आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागासह तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.वारसा हक्क, खरेदी-विक्री व्यवहारांमुळे जमिनीचे सातत्याने तुकडे पडत आहेत. छोटे-छोटे विखुरलेले तुकडे होत असल्याने शेती करताना बियाणे, खते, अवजारे तुकड्यांमध्ये हलवण्याच्या कामात वेळ, श्रम, पैशांचा अपव्यय होतो, तसेच देखभालीतही अडचणी येतात. त्याशिवाय, हद्दीवरून मोठे वाद निर्माण होतात. सोबतच छोट्या तुकड्यांमध्ये शेततळे, विहीर खोदणे, पाण्याचे पाट, चर खोदणे, रस्ते ठेवणे शक्य होत नाही. या सर्व कारणांमुळे किफायतशिर शेती करणे जमत नसल्याने ती पडीत ठेवली जाते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम १९४७ अमलात आला. विदर्भ, मराठवाड्यात हा कायदा १ एप्रिल १९५९ पासून लागू झाला. या कायद्यांतर्गत राज्यातील गावांमध्ये जमीन एकत्रीकरण योजना राबवण्यात आली; मात्र ११७९६ गावांमध्ये ती राबवलीच नाही. दरम्यान, या कायद्याला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ज्या गावातील ७५ टक्के खातेदार ग्रामसभांमध्ये तसा ठराव घेतील, त्याच गावांमध्ये ही योजना राबवण्याचे ठरले. त्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन जिल्ह्यातील गावांचे ठराव मागवण्याचा प्रयत्न भूमी अभिलेख विभागाने केला. विशेष ग्रामसभेत हा ठराव ठेवण्याचे भूमी अभिलेख विभागाने म्हटले. वर्षात आता चारच ग्रामसभा घेता येतात, अशी परिस्थिती असली तरी एप्रिल २०१८ नंतर आतापर्यंत तीन ग्रामसभा पार पडल्या. त्यापैकी कोणत्याही सभेत जमीन एकत्रीकरणाच्या ठरावावर चर्चाच झाली नाही. त्यातच खातेदारांनी एकत्र येऊन मागणी केल्यास ही योजना राबवता येईल. त्यासाठी प्रशासन काय करू शकते, याबाबत शासनाकडेच मार्गदर्शन मागवण्याची तयारी पंचायत विभागाने केली. त्यानुसार जिल्ह्यात विशेष ग्रामसभा घेण्याबाबत शासन काय सांगते, यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला