शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आशिया खंडातील पाणपक्ष्यांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 01:51 IST

‘एशियन बर्ड काऊंट’; बीएनएचएससह विविध संस्थांचा उपक्रम.

विवेक चांदूरकर/वाशिम : प्रदूषण व वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आशिया खंडात 'एशियन बर्ड काऊंट' हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, या अंतर्गत पाणपक्ष्यांची गणना करण्यात येत आहे. ९ ते २४ जानेवारीदरम्यान हे सर्वेक्षण चालणार असून, यामध्ये निदर्शनास पडणार्‍या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. तसेच जैवविविधतेबाबतही माहिती गोळा करण्यात येणार आहे. आशिया खंडात कोणत्या पक्ष्यांची संख्या किती प्रमाणात आहे, याचा ताळेबंद घेण्यासाठी ह्यएशियन बर्ड काऊंटह्ण हा उपक्रम वॉटरफॉल सेन्सस या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या देशातील विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. भारतात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहे. ९ ते २४ जानेवारीदरम्यान संपूर्ण देशातील विविध पाणवठय़ांवर येणार्‍या पाणपक्ष्यांची यादरम्यान पाहणी करण्यात येणार असून, त्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. याकरिता राज्यानुसार किंवा विभागानुसार बीएनएचएस विविध संस्थांची मदत घेत आहे. या संस्थांच्या माध्यमातून पक्षीमित्र संपूर्ण देशातील पाणवठय़ांवर पक्षीनिरीक्षण करीत आहे. याकरिता विविध विभागाला काही दिवस ठरवून देण्यात आले आहे. पाणवठय़ांवर कोणते पक्षी आहेत, त्यापैकी कोणते स्थलांतरित आहेत, कोणते स्थानिक आहेत, त्यांची संख्या किती आहे, गतवर्षी त्यांची संख्या किती होती, त्यांच्या हालचाली कशा होत्या, या सर्व बाबींची नोंद घेणार आहेत. या नोंदींचा संपूर्ण डाटा बीएनएचएसकडे पाठविण्यात येणार आहे. बीएनएचएस हा डाटा आशियातील संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे. पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत असल्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. तसेच पक्ष्यांच्या जीवनपद्धतीत अनेक बदल होत आहे. काही पक्ष्यांची संख्या वाढत आहे, तर काहींची घटत आहे. या संपूर्ण बाबी या सर्वेक्षणात टिपण्यात येणार आहे.