अकोला: पोलीस मुख्यालयात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल जोशी व फौजदार महादेव देशमुख यांना तडकाफडकी निलंबित केल्याची माहिती रविवारी सायंकाळी समोर आली. दोघांना मुख्यालय आरपीआय तिडके यांच्यासोबत हुज्जत घालणे चांगलेच भोवले असल्याची चर्चा पोलिसांमध्ये होती. आरपीआय म्हणून विशाल तिडके हे नुकतेच पोलीस मुख्यालयात रुजू झाले. सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल जोशी आणि फौजदार महादेव देशमुख हे मनमानी पद्धतीने काम करीत होते. पोलीस खात्याची बदनामी करणे, मनात येईल त्या पद्धतीने वागणे, स्थापित कार्यपद्धतीमध्ये बाधा घालणे, कामामध्ये ढवळाढवळ करणे आदी कारणांचा त्यांच्यावर ठपका ठेवून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दोघांना निलंबित केले. काही दिवसांपूर्वी दोघांनीही आरपीआय तिडके यांच्यासोबतच हुज्जतही घातली होती. याबाबत दोघांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर जोशी व देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
एएसआय, फौजदार निलंबित
By admin | Updated: June 6, 2016 02:43 IST