शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

भांबेरी येथे कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: May 7, 2014 04:14 IST

भांबेरी : विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

भांबेरी : विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येथील विद्युत कंपनीचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून, येथे कार्यरत कर्मचारी, अभियंता येथील कार्यालयात हजर राहत नाही. कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, असा नियम आहे; परंतु येथे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी सुरू आहे. भांबेरी येथे सोमवार ते बुधवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० आणि गुरुवार ते रविवार रात्री ११.३० ते सकाळी ९.३० अशा प्रकारे थ्री फेजची विद्युत मिळते; परंतु येथे एकही कर्मचारी नसल्याने रात्री लाईनवर बिघाड झाल्यावर पाणीपुरवठ्याच्या मशीन बंद पडतात. त्याविषयी माहिती किंवा दुरुस्तीसाठी इंजिनीअर वा कर्मचारी यांना फोन लावले, तर त्यांचे फोन बंद असतात. फोन चालू असला, तर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. शिवाय पाणीपुरवठाही प्रभावित होतो. या गावाला गाडेगाव शिवारातील कूपनलिकेवरून पाणीपुरवठा होतो. गावानजीकच्या विहिरीला खारे पाणी असल्याने गावानजीक पिण्याचे पाणीच नाही. हे गाव खारपाणप˜्यात येत असल्यामुळे दूरवरून या गावाला पाणीपुरवठा होतो. त्यात विद्युत मंडळाच्या लहरीपणामुळे येथील पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)