शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसह रेल्वेतून उडी घेणार्‍या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:26 IST

अकोला : एका महिलेने चिमुकल्या मुलांसह रेल्वेगाडीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अकोला रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. 

ठळक मुद्देकारागृहात रवानगी  जखमी मुलांना दिले वडिलांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एका महिलेने चिमुकल्या मुलांसह रेल्वेगाडीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अकोला रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. अमरावती शहरातील संजय गांधी नगरात राहणारी आम्रपाली सुनील बनसोड (३0), प्रियंका बनसोड (२) आणि प्रथमेश बनसोड (३) हे तिघे माय-लेक १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरूम ते माना रेल्वे स्टेशनदरम्यान लोहमार्गावर जखमी अवस्थेत पडून असल्याचे बडनेर्‍याहून अकोल्याकडे जाणार्‍या मालगाडीच्या चालकाला दिसले. त्यांनी तातडीने ही माहिती माना रेल्वे स्टेशन मास्टरला दिली. स्टेशन मास्टर यांनी बडनेरा रेल्वे पोलिसांच्या मदतीने जखमी अवस्थेतील माय-लेकांना भुसावळ ते नागपूर पॅसेंजर रेल्वेगाडीने बडनेरा येथे रवाना केले. तेथून रेल्वे पोलिसांनी जखमी विवाहिता व तिच्या मुलांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले; परंतु तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने, रेल्वे पोलिसांनी त्यांना नागपुरातील रुग्णालयात हलविले. या प्रकरणात अकोला रेल्वे पोलिसांनी महिलेविरुद्ध भादंवि कलम ३0७ व ३0९ नुसार गुन्हा दाखल केला. या तिघाही जणांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. अकोला रेल्वे पोलिसांनी नागपूर येथून महिलेला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले. तिच्याकडून बाजू मांडणार्‍या विधिज्ञांनी न्यायालयाकडे ही महिला मानसिक रोगी असून, तिला जामीन देण्याची मागणी केली; परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत, तिला कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. जखमी मुलांना वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.