शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन समाज गणेश मंडळाने फडकविले काळे झेंडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:23 IST

अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती  २१ फुटांपेक्षा अधिक उंच असल्याचे कारणाने जिल्हा प्रशासनाने या  मंडळाला विसर्जन मिरवुणकीत सहभागी होण्यास विरोध केल्याने या  मंडळाद्वारे प्रशासन व व स्थानिक पदाधिकार्‍यांच्या नावाने जाहीर  निषेधाचे फलक लावून काळे झेंडे फडकाविले. या प्रकारामुळे मानेक  टॉकीज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देगणेश मूर्तीपुढे दिवसभर बंदोबस्तदिवसभर तणावमंडळातील वादाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती  २१ फुटांपेक्षा अधिक उंच असल्याचे कारणाने जिल्हा प्रशासनाने या  मंडळाला विसर्जन मिरवुणकीत सहभागी होण्यास विरोध केल्याने या  मंडळाद्वारे प्रशासन व व स्थानिक पदाधिकार्‍यांच्या नावाने जाहीर  निषेधाचे फलक लावून काळे झेंडे फडकाविले. या प्रकारामुळे मानेक  टॉकीज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.माळीपुरा परिसरातील अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गत  ८१ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे. या  मंडळांच्या गणेश मूर्तीची उंची २१ फुटांपेक्षा अधिक असल्याने विद्युत  वितरण कंपनीच्या तारांना लागणार हा धोका लक्षात घेता, या  मंडळाला सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास  जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे या मंडळाच्या कार्यक र्ते व पदाधिकार्‍यांनी या परिसरात दिवसभर काळे झेंडे फडकावित  प्रशासन व स्थानिक पदाधिकार्‍यांचा निषेध केला.

गणेश मूर्तीपुढे दिवसभर बंदोबस्तसार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी  नाकारल्यानंतर मंडळाच्या गणेश मूर्तीसमोर पोलीस प्रशासनाद्वारे  दिवसभर ते रात्री उशिरापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर वातारवणात तणाव निर्माण  झाल्याने मूर्तीच्या चारही बाजूने बॅरीकेड्स लावण्यात आले होते.

दिवसभर तणावअर्जुन समाज गणेशोत्सव मंडळाला परवानगी नाकारल्यानंतर या  परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा  ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. क्यूआरटी, आरसी पीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणावर ठाण मांडून होते.

मंडळातील वादाची चर्चाअर्जुन समाज सार्वजनिक गणेशाोत्सव मंडळाला परवानगी  नाकारल्यानंतर या ठिकाणावर दोन मंडळातील वादामुळे ही परवानगी  नाकारल्याची चर्चा होती. त्यामुळे या ठिकाणावर वाद होण्याची शक्य ता असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.-