शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले

By admin | Updated: November 23, 2014 01:17 IST

शेतकरी सामूहिक गटाचा सहभाग, शिवापूर येथे दीडशे हेक्टरवर कांदा बीजोत्पादन.

अकोला: जिल्हय़ात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत असून, शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवापूर येथील शेतकरी सामूहिक गटाने दीडशे हेक्टरवर कांदा लागवड करू न भरघोस कांद्याचे उत्पादन घेतले आहे. जिल्हय़ात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. शिवा पूर येथील शेतकरी गट व शेतकर्‍यांनी स्वतंत्ररीत्या एकशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन पिकाची लागवड केली आहे. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्याने या परिसरात, शेजारच्या गावातील शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे. जिल्हय़ात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दीडशे हेक्टर कांदा या ठिकाणी घेतला जात असून, या पिकांतून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यामध्ये उत्साह आहे. पुढच्यावर्षी या क्षेत्रात वाढ करण्यात येणार असून, कांदा हे पीक अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने या पिकावर गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्यासाठीचा संकल्प या शेतकरी गटाने केला आहे.शेतकर्‍यांच्या या कांदा बीजोत्पादन प्रयोगाला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी भेट दिली. जिल्हाधिकार्‍यांनी बचत गटाचे अध्यक्ष वैकुंठ ढोरे आणि सचिव सुनील सिरसाट यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. शेतकरी गटाच्या माध्यमातून या कांद्याचे ब्रॅन्ड करण्यावर भर देऊन कांद्याची विक्री करण्याचा सल्ला जिल्हाधिकार्‍यांनी दिला. यासाठी कृषी विभाग, आत्माने या गटांना कांदा बीजोत्पादनासाठी जशी मदत केली तशीच मदत बॅ्रन्डसाठी करावी, अशा सूचना केल्या.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कृषी व आ त्मांतर्गत ज्या योजना असतील त्या योजनांचा शेतकरी गटांना लाभ व्हावा, हा प्रयत्न केला जात असून, शिवापूरच्या शेतकरी गटासोब त आम्ही असल्याचे सांगितले.