शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:33 IST

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

अकोला: राज्यात ४० लाख हेक्टरवर असलेले खरीप ज्वारीचे क्षेत्र आता ८ ते ९ लाखांवर आले असून, यामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण तर झालाच, हमखास कमी पावसात येणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोमवारी संपूर्ण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यंत तीनच्यावर खरीप ज्वारीची जात विकसित केली असून, रब्बी हंगामासाठी विशेष पीकेव्ही क्रांती, हुरड्याची पीडीकेव्ही कार्तिकी ज्वारीचे वाणही विकसित केले आहे. हे गोड असून, चव चांगली आहे; पण गेल्या काही वर्षात ज्वारीची पेरणीच घटली आहे. याला पावसाची अनिश्चितता असल्याचे सांगण्यात येत असले तरी ज्वारीला मिळणारे तुटपुंजे दर हे कारण महत्त्वाचे आहे, तसेच पेरणी केल्यानंतर होणारा वन्य प्राण्याचा त्रासही मोठा असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे पाठ फिरवली आहे; परंतु यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात गुरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने ज्वारी पेरणीची चळवळ सुरू केली असून, पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठीच शेतकऱ्यांच्या शेतावर शेती शाळा घेऊन शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी, संगोपण, तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत आहे. यावर्षी ही सुरुवात अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप या गावातून सोमवार, ११ फेब्रुवारी करण्यात आली आहे. शेतीशाळेला कृषी विद्यापीठच अवतरल्याने शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

- रब्बी ज्वारीचे क्षेत्र राज्यात २८ लाख हेक्टरवर असले तरी पावसावर अवलंबून असलेल्या खरीप ज्वारीचे क्षेत्र ४० लाखाहून ८ लाखावर आले आले. म्हणूनच ज्वारी संशोधन करू न शेतकºयांना ज्वारी पेरणीसाठी शेतावर जाऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे.डॉ. आर.बी. घोराडे,ज्वार संशोधक,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती