शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच १०७ कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:49 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने तब्बल १०७ कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश जारी केले आहेत.

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने तब्बल १०७ कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश जारी केले आहेत. कार्यादेश जारी केलेल्या कामांना कायदेशिरदृष्ट्या कोणताही अडथळा नसल्याने हद्दवाढीच्या भागासह ठिकठिकाणी रस्ते, नाली व इतर कामे प्रगतीपथावर असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दलितेतर व सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या ४८ कामांपैकी १८ व नागरी दलित वस्तीचे सहा अशा एकूण २४ कामांच्या निविदा अप्राप्त असल्याने सदर कामे लांबणीवर गेली आहेत.महापालिका क्षेत्रात शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना व पाणी पुरवठा वितरण प्रणालीची कामे सुरू आहेत. २०१७ मध्ये केंद्र व राज्य शासनाने ‘अमृत’ला मंजुरी दिली होती. त्यावेळी मनपा प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश जारी केले होते. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ केली. हद्दवाढ केल्यानंतर संबंधित नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी मनपाने ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला असता, त्यापैकी ९७ कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी दिली. सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन प्रभागातील विकास कामे निकाली काढण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नात होते. मनपा प्रशासनानेसुद्धा तातडीने विकास कामांची यादी तयार करून त्याला राज्य शासनाची मान्यता मिळवली. निविदा प्रक्रिया राबवून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कार्यादेश (वर्क आॅर्डर) जारी केले. यामध्ये ९७ कोटींच्या कामांचा समावेश असून, उर्वरित दहा कोटींमध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजना व नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांचा समावेश आहे.८ मार्चपर्यंत निविदाच नाहीत!

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या ४८ कामांपैकी १८ व नागरी दलित वस्तीचे सहा अशा एकूण २४ कामांसाठी मनपाने निविदा अर्ज बोलावले होते. याकरिता ८ मार्चपर्यंत मुदत होती. या कालावधीत मनपाकडे निविदा अर्ज प्राप्तच झाले नाहीत. आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासनाला फेरनिविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याने ही कामे लांबणीवर गेली आहेत.आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रशासनाने विकास कामांचे कार्यादेश जारी केले. यामुळे सदर कामे सुरू राहतील. नवीन कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवता येणार नाही.-संजय कापडणीस आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका