शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती गठित करण्याची मान्यता.

By admin | Updated: October 13, 2015 22:48 IST

आंतरविभागीय कार्यरत गटाची स्थापना; कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची अध्यक्ष म्हणून नियुक्त.

खामगाव (जि. बुलडाणा) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या असून आंतरविभागीय कार्यरत गट आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यासाठी राज्य शासनाने १२ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. केंद्र शासनाने सन २0१५-१६ या वर्षापासून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्याचे निश्‍चित केले आहे. यामध्ये गतिमान सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शेतीला पाणी या सुत्रांनुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक, पाणलोट क्षेत्र विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, आंतरविभागीय कार्यरत गटाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या गटामध्ये अप्पर मुख्य सचिव (पर्यावरण) त्याचप्रमाणे ग्रामविकास, जलसंपदा, नगर रचना, माहिती व तंत्रज्ञान, पाणी पुरवठा, उद्योग या विभागाच्या प्रधान सचिवांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जलसंधारण, लाभक्षेत्र विकास, वन विभागाचे सचिव आणि कृषी आयुक्तांचाही सदस्य म्हणून समावेश आहे. सह संयोजक म्हणून मृदसंधारण विभागाचे संचालकांची नेमणूक केली आहे. सदस्य सचिव म्हणून कृषी विभागाच्या उपसचिवांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

*जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची धुरा जिल्हाधिकार्‍यांच्या खांद्यावर!

           जिल्हा स्तरावर अंमलबजावणीच्या अनुषंगाने आंतर विभागीय समन्वयासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य वनसंरक्षक, जलसंपदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता, आत्माचे प्रकल्प संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकार्‍यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाईल. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.