शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित जागांच्या १,८१० प्रस्तावांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:14 IST

शासकीय योजनेतील घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी १ हजार ८१० प्रस्तावांना जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देलाभार्थींना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली.अतिक्रमित घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता १ हजार ८१० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. अतिक्रमित घरांसाठी घरकुल योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

- संतोष येलकर

अकोला: ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमानुकूल करून, अतिक्रमित जागेवरील लाभार्थींना शासकीय योजनेतील घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी १ हजार ८१० प्रस्तावांना जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांच्या लाभार्थींना, त्यांनी केलेल्या अतिक्रमित केलेल्या जागा निवासासाठी (घरांसाठी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत गत १६ फेबु्रवारी २०१८ रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमानुकूल करून, घरकुल योजनेंतर्गत लाभार्थींना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमित घरांचे प्रस्ताव जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून आॅगस्ट अखेरपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रदत्त समितीकडे सादर करण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांनुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात ग्रामीण भागातील शासकीय जमीनीवरील घरांची अतिक्रमणे नियमानुकूल करून, अतिक्रमित घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता १ हजार ८१० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमित घरांसाठी घरकुल योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.‘सर्वांसाठी घरे -२०२२’ या शासनाच्या धोरणांतर्गत जिल्ह्यातील गरिब-वंचित कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरे नियमानुकूल करून, जागा उपलब्ध करून देण्याकरिता १ हजार ८५० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुलासाठी ज्या लाभार्थींना जागा उपलब्ध नाही, त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- आस्तिककुमार पाण्डेयजिल्हाधिकारीशासनाच्या ‘सर्वांसाठी घरे ‘या धोरणाच्या अंमलबजावणीत ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरांची अतिक्रमणे नियमाकूल करून, घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, काही आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.- संजय खडसेउपविभागीय अधिकारी, बाळापूर.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय