शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीतील ११ कोटींच्या कामांची मंजुरी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:10 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने  जिल्हय़ातील काही ठरावीक गावातील दलित वस्तीच्या  कामांच्या ११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना दिलेली मंजुरी  गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेत रद्द करण्यात आली.  त्याचवेळी अनेक गावांतील वंचित दलित वस्त्यांच्या प्रस् तावांसह नव्याने २0 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्या त येईल, असेही सभेत ठरले. विशेष म्हणजे, दलित वस् तीच्या निधी वाटपात अनेक गावांवर अन्याय झाल्याचे  ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडले होते.

ठळक मुद्देवंचित गावांच्या नव्या प्रस्तावांसह २0 कोटींची कामे प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने  जिल्हय़ातील काही ठरावीक गावातील दलित वस्तीच्या  कामांच्या ११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना दिलेली मंजुरी  गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेत रद्द करण्यात आली.  त्याचवेळी अनेक गावांतील वंचित दलित वस्त्यांच्या प्रस् तावांसह नव्याने २0 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्या त येईल, असेही सभेत ठरले. विशेष म्हणजे, दलित वस् तीच्या निधी वाटपात अनेक गावांवर अन्याय झाल्याचे  ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडले होते.दलित वस्ती विकास आराखड्यानुसार मूर्तिजापूर पंचायत  समितीमध्ये तब्बल २ कोटी २0 लाख रुपयांच्या कामांचा  यादीत समावेश आहे. २२ गावांतील दलित वस्तीच्या नावा पुढे निधी देण्यात आला. त्यातही भाजप सदस्याच्या सिरसो  गटातच हा निधी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या  एकाच मतदारसंघातील गावांमध्ये एक कोटी रुपयांचे  नियोजन आहे. अकोला तालुक्यातील ३२ गावांच्या दलित  वस्त्यांसाठी २ कोटी १७ लाख रुपयांचे प्रस्ताव आहेत. या  तालुक्यात भारिप-बमसंची सदस्य संख्या अल्प आहे. सदस्य  सरला मेश्राम यांच्या मतदारसंघातही निधी मिळालेला नाही.  त्याउलट इतर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये निधीचे  वाटप मोठय़ा प्रमाणात दर्शविण्यात आले आहे.  बाश्रीटाकळीतील कान्हेरी सरप, पातूर तालुक्यातही तोच  प्रकार घडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध  केले होते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे  यांच्याकडे झालेल्या तक्रारीनुसार नियोजन रद्द करण्याचे  आदेश त्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यावर गुरुवारी  झालेल्या समितीच्या सभेत त्या नियोजनाला देण्यात आलेली  मंजुरी रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. आता दलित वस् ती विकास कामांसाठी असलेल्या एकूण २0 कोटींच्या निधी  खर्चासाठी नव्याने प्रस्ताव मागवा, त्या खर्चासाठी प्रस्ताव  आल्यानंतर सर्वांना एकत्रितपणे मंजूर करण्याचेही यावेळी  ठरले. यावेळी सभापती रेखा अंभोरे, सदस्य सम्राट  डोंगरदिवे, सरला मेश्राम, बाळकृष्ण बोंदरे, बाळापूरच्या  सभापती मंगला तितूर यांच्यासह प्रभारी समाजकल्याण  अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते. 

पीठगिरणीचा निधी वळतासर्वसाधारण लाभार्थींना पीठगिरणी वाटप योजनेसाठी तरतूद  केलेला ४९ लाखांचा निधी वळता करण्याचा ठराव घेण्यात  आला. हा निधी दलित वस्तीमध्ये असलेल्या खुल्या जागांवर  वृद्धांना बसण्याची सोय करणे, लहान मुलांसाठी  खेळण्याच्या सोयी-सुविधांवर खर्च करण्याचे ठरले. दिव्यांग  लाभार्थींना तीन टक्के खर्चातून पीठगिरणी दिली जाणार  आहे. 

जि.प.च्या शाळेत स्पर्धा परीक्षा पुस्तकेमागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुरवठा  करण्यासाठी पाच लाख रुपये तरतूद वाढवण्यात आली. आ ता १५ लाख रुपये खर्चातून जिल्हा परिषदेच्या ५१ माध्यमिक  आणि चार उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या  तयारीची पुस्तके दिली जाणार आहेत. या ठरावाला मंजुरी  देण्यात आली.