शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महावितरणच्या पेमेंट वॉलेटसाठी ४ हजारावर अर्ज; मंजुरीची प्रक्रिया मात्र ठप्प

By atul.jaiswal | Updated: September 4, 2019 11:59 IST

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे महावितरणने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे.

ठळक मुद्देआवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड कराव्या लागाव्या लागतात. पेमेंट वॉलेटसाठी राज्यभरातून ४ हजारावर नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु आतापर्यंत जवळपास ३०० अर्जच मंजूर झाले आहेत.

 - अतुल जयस्वालअकोला: वीज बिल भरणा प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासोबतच वीज ग्राहकांना या प्रक्रियेत सामावून घेत त्यांना अर्थार्जनाची संधी देण्यासाठी महावितरणने ‘लाँच’ केलेल्या पेमेंट वॉलेटसाठी राज्यभरातून ४ हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यामुळे महावितरणने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. त्यामुळे वॉलेटधारक होणाऱ्यांचा संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर येत असलेल्या ‘मॅसेज’मुळे हिरमोड होत आहे.महावितरणने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार मार्गदर्शनाखाली स्वत:चे पेमेंट वॉलेट आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाºया १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येते. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी राज्यातील जवळपास ४ हजार नागरिकांनी पेमेंट वॉलेटसाठी अर्ज दाखल केले आहेत. पेमेंट वॉलेटसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड कराव्या लागाव्या लागतात. अपलोड झालेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर महावितरण मुख्यालयाकडून संबंधित व्यक्तीस पेमेंट वॉलेट मंजूर केल्या जाते. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे कागदपत्रांची पडताळणी करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे महावितरणने तूर्तास ‘पेमेंट वॉलेट’ मंजुरीची प्रक्रिया थांबविली असल्याची माहिती महावितरणमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.केवळ ३०० ‘वॉलेट’ मंजूरपेमेंट वॉलेटसाठी राज्यभरातून ४ हजारावर नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही जोडली आहेत; परंतु आतापर्यंत जवळपास ३०० अर्जच मंजूर झाले आहेत. इतरांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे.‘महापॉवर पे’ नामकरणमहावितरणने १२ जुलै २०१९ रोजी ‘पेमेंट वॉलेट’ आणले. तेव्हापासून हे वॉलेट अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता या वॉलेटचे नामकरण ‘महापॉवर पे’ असे करण्यात आले आहे. 

पेमेंट वॉलेटसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. कागदपत्रांची पडताळणी करून असलेल्या त्रुटी दूर करण्यात वेळ जात असल्यामुळे नव्याने अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आली आहे.

- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण