शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाविरोधातील अर्ज सह्या कमी पडल्याने फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:38 IST

मूर्तिजापूर : पडताळणीत ६० सह्या पडल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: खानापूर रोडवरील ढोणे नगराजवळील दारूचे दुकान बंद करण्यासाठी प्रवीण इंगळे यांच्यासह काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने २० जुलै रोजी सकाळी १०.३० ते ५ वाजेपर्यंत खानापूर ग्रामपंचायत कार्यालयात सह्यांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ६० सह्या कमी पडल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात आला आहे.खानापूर ग्रामपंचायतमध्ये ८११ महिला मतदार आहेत. त्याच्या २५ टक्के म्हणजे २०३ महिलांच्या सह्यांची पडताळणी होणे गरजेचे होते. त्यामुळे पडताळणीत तेवढ्याच महिलांच्या सह्या पाहिजे होत्या. प्रत्यक्षात तक्रार अर्जावर २२९ सह्या होत्या. त्यापैकी पडताळणीत १४३ महिला अर्थात १६.२२ टक्के महिलाच सह्यांसाठी उपस्थित होत्या. परिणामी, सह्यांच्या आवश्यक कोट्यापेक्षा ६० महिलांच्या सह्या कमी पडल्या. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता या विषयावर मतदान होणार नाही व दारूचे दुकानसुद्धा बंद होणार नाही.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजेश काळे यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाक्षरी पडताळणी पथकामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक आनंद काळे, मूर्तिजापूरचे दुय्यम निरीक्षक शैलेंद्र ठाकूर, त्यांचे कॉन्स्टेबल, खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच गजानन धाडसे, उपसरपंच सुरेश कावळे, ग्रामसेवक वैशाली खाकरे, नायब तहसीलदार नीलेश मडके, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पातुर्डे, पातूरचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्यासह त्यांचे अधीनस्थ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.