शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही या; अन् दाखला घेऊन जा!

By admin | Updated: April 18, 2016 02:21 IST

गुरांच्या बाजारातील वास्तव: पाहणीविनाच मिळतोय जनावर मालकीचा दाखला; ओळखपत्राकडे दुर्लक्ष.

संतोष वानखडे / वाशिमचोरीच्या जनावर विक्रीला पायबंद बसावा, जनावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सहकार व पणन विभागाने घालून दिलेल्या नियमांकडे जिल्हय़ातील कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकारे 'लोकमत स्टिंग' ऑपरेशनद्वारे समोर आला आहे. कोणतीही शहानिशा न करता जनावर मालकीचा दाखला बिनधास्त दिला जात असल्याने, चोरीची जनावरेही खपविली जात असल्याची साधार शक्यता व्यक्त होत आहे. रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व मानोर्‍याच्या गुरांच्या बाजारात ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान जनावर मालकीच्या दाखल्याची कोणतीही शहानिशा न करता ह्यखरेदी-विक्रीह्णच्या व्यवहारावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जात असल्याचे दिसून आले.वाशिम जिल्हय़ात बाजार समिती व उपबाजारातून जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. चोरीच्या जनावरांच्या विक्रीला रोक लावणे आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे या दुहेरी उद्देशाने सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाने दिलेला जनावर मालकी हक्काचा दाखला पशुपालकाने सोबत आणणे बंधनकारक आहे. जनावर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर बाजार समितीमधून जनावर घेणार्‍याला अधिकृत दाखला घ्यावा लागतो. असा दाखला देताना संबंधितांनी सरपंच किंवा पोलीस पाटलाचा दाखला, ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड पाहणे आवश्यक आहे. वर्णन केलेल्या जनावरांची खात्री म्हणून पाहणी करणेही आवश्यक आहे. या नियमाला गुरांच्या बाजारात पायदळी तुडविले जात असल्याची माहिती 'लोकमत' चमूला मिळाल्याने बाजाराच्या दिवशी रिसोड, मालेगाव, वाशिम येथे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या. जनावर खरेदी-विक्री करणार्‍या इसमांची कोणतीही खातरजमा केली जात नाही, ओळखीचा पुरावा न मागताच जनावराच्या खरेदी-विक्रीचा अधिकृत दाखला दिला जात असल्याचे दिसून आले. अधिकृत दाखल्यामुळे चोरीच्या जनावरांची वाहतूक कशी रोखावी, असा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडला आहे.