शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आणखी एक बळी; २९ नवे ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ रुग्णांचे अहवाल ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ येथील तीन जण, गोरक्षण रोड, डाबकी रोड, उन्नती नगर, कौलखेड व रामदासपेठ येथील प्रत्येकी दोन, तर बिर्ला कॉलनी, आदर्श कॉलनी, तापडिया नगर, मलकापूर, दीपक चौक व बैदपुरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. संध्याकाळी बार्शीटाकळी बस स्टॅण्ड, तारफैल, बाळापूर, खदान, घुसर व कौलखेड येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

मंगळवारी खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सातव चौक भागातील ६१ वर्षीय पुरुष असून, त्यांना २५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड चाचण्यांमध्ये चार ‘पॉझिटिव्ह’

सोमवारी झालेल्या एकूण ७७ रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्ये केवळ चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६३९३ चाचण्यांमध्ये १८३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

२० जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन अशा एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.