अकोला : तापमान ४0 अंश सेल्सिअसच्यावर असतानाही शहरात ह्यस्वाइन फ्लूह्णचा प्रसार झपाट्याने होत असून, शनिवारी या आजाराची लागण झालेला आणखी एक ह्यपॉझिटिव्हह्ण रुग्ण आढळून आला. यासोबतच स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराबाबत दहशतीचे वातावरण आहे. एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराच्या विषाणूंचा हवेच्या माध्यमातून प्रसार होतो. शहरात मार्च महिन्यात या आजाराचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून झपाट्याने या आजाराचा प्रसार होत असून, आतापर्यंत शहरातील तीन, तर पातूर येथील एक असे एकूण चार बळी या आजाराने घेतले आहेत. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असलेले रुग्ण शहरातील खासगी व सवरेपचार रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोरक्षण रोड भागातील एका इसमास ह्यस्वाइन फ्लूह्णसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना एका खासगी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वॉबची चाचणी केल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी या रुग्णास सवरेपचार रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘स्वाइन फ्लू’चा आणखी एक पॉझिटिव्ह
By admin | Updated: April 30, 2017 03:07 IST