शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एकाचा मृत्यू, २३ नवे पॉझिटिव्ह, ९१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये राधाकिशन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर व्याळा ता. बाळापूर, रामनगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहरनगर, गीतानगर, आकाशवाणीनगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

सोमवारी अकोला शहरातील कबीरनगर भागातील ६२ वर्षीय महिलेचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये दोन पॉझिटिव्ह

सोमवारी दिवसभरात करण्यात आलेल्या १०१ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये केवळ दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत झालेल्या २७,०४१ चाचण्यांमध्ये १८६१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

९१ जणांना डिस्चार्ज

सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८२ अशा एकूण ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६५४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८९३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.