अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ७५ कोटी ११ लाखांचा निधी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. जिल्ह्यातील १ लाख ४0 हजार ९७0 दुष्काळग्रस्त शेतकर्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली. नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्यांच्या मदतीसाठी १४५ कोटी २४ लाख २१ हजार ४५८ रुपयांच्या मदतनिधीची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी मदतनिधीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा निधी जानेवारीमध्ये प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्हा प्रशासनामार्फत २७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ लाख ४२ हजार ६३७ दुष्काळग्रस्त शेतकर्यांना ७३ कोटी १७ लाख रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला. त्यानंतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी मदतनिधी वितरणाच्या दुसर्या टप्प्यात शासनामार्फत अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी आणखी ७५ कोटी १७ लाखांचा मदत निधी बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला. यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.
शेतक-यांच्या मदतीसाठी आणखी ७५ कोटी!
By admin | Updated: February 5, 2015 01:40 IST