शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात आणखी ६५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३९२९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:42 IST

रविवार, ३० आॅगस्ट रोजी आरटपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ३० आॅगस्ट रोजी आरटपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,९२९ वर पोहचली आहे. दरम्यान, आतापर्यंत १५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी २५३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २६ महिला व ३९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोºहळ ता. बाशीर्टाकळी येथील १६ जण, सस्ती ता.पातूर येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बधे, सोनारी ता. मूर्तिजापूर, पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सौंदळा ता. तेल्हारा व बटवाडी ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.६३४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,९२९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३१४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६३४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या