शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मध्यवर्ती कारागृहात आणखी ५० कैद्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 13:30 IST

कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत.

ठळक मुद्दे कारागृहात ४०० पेक्षा अधिक कैदी.६८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.इतर ३०० कैद्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका

अकोला : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक खेड्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कारागृहात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपुर्वी १८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर रविवारी आलेल्या अहवालात सुमारे ५० कैदी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत.कारागृह प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून गत तीन महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते; मात्र मंगळवारी रात्री कारागृहातील सुमारे १८ कैद्यांना कोरोना असल्याचा अहवाल आणि त्यानंतर रविवारी तब्बल ५० कैदी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे समोर येताच प्रशासनाला धक्का बसला. ५ दिवसात सुमारे ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने आता कारागृहातील ४०० कैदीही धोक्यात सापडले आहेत. आतापर्यंत शहराच्या विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्य वाढतीच होती; मात्र आता कारागृहातही कोरोनाने मोठा शिरकाव केल्यामुळे कारागृह प्रशासनावर मोठे संकट आले आहे. एका बरॅकमधील तब्बल १८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर आता विविध बरॅकमधील तब्बल ५० कैद्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपुर्ण कारागृहच आता कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची संख्या आधीच कमी करण्यात आली आहे. ७० पेक्षा अधिक कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले; मात्र त्यानंतरही आता कारागृहात ४०० पेक्षा अधिक कैदी असून त्यामधील ६८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रोज सकाळी एकमेकाच्या संपर्कात आलेल्या उर्वरीत ३२२ कैद्यांनाही कोरोना होण्याचा मोठा धोका आहे. आता खबरदारी म्हणूण कैद्यांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. या ठिकाणावरुन कैदी पळून जाणार नाहीत, तसेच त्यांना उपचारही मिळावे, या दृष्टीने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारागृहातील ६८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने इतर ३०० कैद्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आजा बळावला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या