शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २५९ कोरोना पॉझिटिव्ह, ४६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:51 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ८१४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २३५ जणांचे ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ८१४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५७९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १२४ जणांमध्ये अकोट येथील २२, मूर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील सात, कौलखेड व मोठी उमरी येथील पाच, राऊतवाडी व दीपक चौक येथील चार, जीएमसी क्वार्टर, आळशी प्लॉट, डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, जीएमसी होस्टेल, गीतानगर, तापडिया नगर, पार्वतीनगर, खिरपुरी बु., बाळापूर रोड, बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर अमान खॉ प्लॉट, न्यू जैन टेम्पल, मासा, गायत्रीनगर, बंजारानगर, खडकी, रिधोरा, उमरी, फिरदौस कॉलनी, आरोग्य कॉलनी, गजानन पेठ, सीईओ ऑफिसजवळ, रविनगर, गोरक्षण रोड, लहरीया नगर, बाभुळगाव, हनुमान नगर, जस्तगाव, आरएमओ होस्टेल, रजपुतपुरा, गड्डम प्लॉट, काटेपूर्णा, सावंतवाडी, भागवतवाडी, लहान उमरी, अकोट स्टॅण्ड, कृषी नगर, खोलेश्वर, सातव चौक, नंदाणे मंगल कार्यालयाजवळ, लेडी हार्डिंग क्वार्टर, मोरेश्वर कॉलनी, खेळकर नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १०१ जणांमध्ये स्टेट बँकेतील १२ जण, बँक ऑफ बडोदा, कौलखेड, गोरक्षण रोड, जठारपेठ येथील प्रत्येकी सात जण, सिंधी कॅम्प व छोटी उमरी येथील प्रत्येकी सहा जण, डाबकी रोड येथील पाच जण, न्यू राधाकिसन प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार जण, गीतानगर येथील तीन जण, जीएमसी, शास्त्रीनगर, केशव नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने शहर, राऊतवाडी, सहकार नगर, गुढदी, द्वारका नगरी, पळसोबढे येथील प्रत्येकी दोन, तर व्यंकटेश नगर, न्यू भागवत प्लॉट, तापडिया नगर, लेडी हार्डिंग क्वार्टर, माधव नगर, रामनगर, जयहिंद चौक, गोकुळ कॉलनी, चिखलगाव, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, रणपिसेनगर, देवडी, गंगाधर प्लॉट, न्यू खेतान नगर, तुकाराम चौक, नवरंग सोसायटी, तारफैल, रामदास पेठ, गिरीनगर, सावदे प्लॉट, गोडबोले प्लॉट, त्रिवेदी अपार्टमेंट, अनिकेत हनुमान आखाडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये २४ पॉझिटिव्ह

बुधवार १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ११४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये २४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत झालेल्या एकूण ३३,३९३ चाचण्यांमध्ये २३०७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

४६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून आठ, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून चार, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २४ अशा एकूण ४६ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

१,४०७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,१३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,३८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४०७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.