शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ईटीआय मशीनचा वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : प्रवाशांना तिकीट देण्याकरिता जिल्ह्यातील पाचही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या एस.टी.च्या वाहकांना ईटीआय मशीन (ई-तिकीट वेडिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : प्रवाशांना तिकीट देण्याकरिता जिल्ह्यातील पाचही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या एस.टी.च्या वाहकांना ईटीआय मशीन (ई-तिकीट वेडिंग मशीन) देण्यात आलेल्या आहेत; मात्र अनेक मशीन नादुरुस्त होऊन बंद पडल्या आहेत. त्याचा वाहकांना नाहक वैताग होत असून, कारवाईच्या भीतीने त्यांचे मानसिक संतुलनदेखील बिघडत चालल्याचे बोलले जात आहे.

खराब ईटीआय मशीनमुळे माझ्या प्रामाणिकतेवर अप्रामाणिकतेचा ठपका लागणार आहे, असे लिहून ठेवत नांदेड येथील एका वाहकाने माहुर आगारातील बसमध्ये आत्महत्या केली. मशीनमधील तांत्रिक चुकांचा दोष माझ्यावर टाकला जाणार असून, माझ्या आत्महत्येला कुटुंबातील कोणीही दोषी नाही; तर खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चार पानी पत्र लिहून नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या एस. एस. जानकर नामक एस. टी. वाहकाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातीलच माहूर आगारातील एका बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे नादुरुस्त ईटीआय मशीनचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वर्षभरात तक्रारींचे द्विशतक

जिल्ह्यातील पाचही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या वाहकांना देण्यात आलेल्या ईटीआय मशीन प्रवासादरम्यान बंद पडण्याचे अनेक प्रकार गेल्या वर्षभरात घडले आहेत. त्या-त्या आगारात यासंबंधीच्या २०० पेक्षा अधिक तक्रारी झालेल्या आहेत. असे असले तरी हा प्रकार अद्याप कायम आहे.

प्रवासादरम्यान तिकीट वितरित करीत असतानाच ईटीआय मशीन बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशावेळी वाहकांना नाइलाजास्तव कागदावर प्रवासाकरिता आकारलेले पैसे लिहून द्यावे लागतात; मात्र ही पद्धत नियमबाह्य असून तपासणी पथक ही अडचण समजून घेत नसल्याचे काही वाहकांचे म्हणणे आहे.

आजरोजी जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक ईटीआय मशीन नादुरुस्त असून त्या विनाविलंब दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणीही होत आहे.

रोज बिघडतात १० मशीन

अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच आगारांना ३०० च्या आसपास मशीन देण्यात आलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक आगारातील १० मशीन दैनंदिन नादुरुस्त होतात. यामुळे वाहक वैतागले आहेत.

वाहक म्हणतात.....

पूर्वी ‘ट्रे’च्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे दिली जायची. ही पद्धत मोडीत काढून काही वर्षांपासून ईटीआय मशीनद्वारे तिकिटे देण्याची पद्धत अंमलात आणण्यात आली. या मशीनने सोय झाली; मात्र मशीन नादुरुस्त झाल्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- टी. एन. गावंडे, वाहक

ईटीआय मशीन नादुरुस्तीमुळे कधी तिकिटाची प्रिंट न निघणे, प्रवासादरम्यान १० ते १५ मिनिटे मशीन हँग होणे यांसह इतरही स्वरूपातील अडचणी जाणवतात. अशात लाइन चेकिंग पथकाने तपासणी केल्यास तिकिटांमध्ये गोंधळ झाल्याचा ठपका ठेवला जातो.

- अ. सा. गवळी, वाहक

एस. टी. आगाराला ईटीआय मशीन मिळालेल्या आहेत. त्यातील २० मशीन नादुरुस्त असून विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित मशीन सध्यातरी सुस्थितीत सुरू आहेत. मशीन नादुरुस्त झाल्याची वाहकांची तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जाते. एकाही वाहकावर यासंबंधी कारवाई करण्यात आलेली नाही.

- अरविंद पिसोडे, आगार प्रमुख, अकोला

जिल्ह्यातील पाच आगारांना महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना तिकिटे देण्याकरिता ईटीआय मशीन देण्यात आलेल्या आहेत. यामुळे निश्चितपणे वाहकांची सोय झाली; परंतु अनेक मशीनमध्ये बिघाड निर्माण होत आहे. प्रवासादरम्यान मशीन हँग होण्याचे प्रकारही घडत आहेत. ही अडचण गेल्या काही दिवसांत अधिकच वाढली आहे. यात कुठलाच वाहक दोषी नाही. त्यामुळे कारवाई करताना सारासार विचार व्हायला हवा.

- सुदर्शन पजई