शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

पशुसंवर्धन विकास महामंडळ कार्यालयाला ठाेकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST

अकोला : राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी ...

अकोला : राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्ध उत्पादन व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय मागील १८ वर्षांपासून अकोला येथे कार्यरत आहे. पाच फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार हे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यालयातील साहित्य रविवारी हलविले जात असल्याची माहिती मिळताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप ठाेकून राज्य सरकारच्या विराेधात निदर्शने केली

स्थानिक जुने आरटीओ रोड, गोरक्षण रोड येथे कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार निदर्शने करत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात नगरसेवक गिरीश जोशी, मनीराम टाले, माधव मानकर, ॲडव्होकेट देवाशीष काका, संतोष पांडे, गणेश अंधारे, मनोज शाहू, अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, प्रशांत अवचार, आकाश ठाकरे, अभिजित कडू, देवेंद्र तिवारी, डॉ. गौरव शर्मा, बन्सी चव्हाण, विकी ठाकूर, गणेश सपकाळ, राजे शिंदे, मनीष बाचोका, मनीष बुंदिले, मंगेश सांगा, रंजीत खेडकर, ओम कसले, विवेक देशमुख, संदीप गावंडे आदींनी पशुसंवर्धन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठाेकले. खदान पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना अटक केली. या घटनेचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी निषेध व्यक्त केला. रविवारी सुटी असताना हा प्रकार व तातडीने सामान हलवण्याची खरंच गरज होती का, असा सवाल सावरकर यांनी उपस्थित केला.