शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, स्वच्छतागृहांशिवाय अंगणवाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:15 IST

अकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्‍या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावरून बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल शासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. 

ठळक मुद्देजिह्यात १३९0 अंगणवाड्यांमध्ये एक लाखावर बालकेअंगणवाड्यांमधील बालकांची गैरसोय

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्‍या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. यावरून बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल शासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. ग्रामीण भागात एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. कुपोषण कमी करणे, त्यासाठी बालकांना पूरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचे विविध उपक्रमही राबवले जातात. त्याचवेळी त्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचाही विरोधाभास आहे. त्याशिवाय, एवढय़ा लहान बालकांना कोणतीच समज नसते. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेसाठी स्वच्छतागृहांची सोय आवश्यक असताना जिल्ह्यातील ६0 टक्क्यांपेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये ती सोयच नसल्याची आकडेवारी आहे. देशात विकासाचे ढोल बडवणे सुरू असताना अंगणवाड्यातील बालकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. त्यातून नेमका कोणाचा विकास साधला जात आहे, ही बाबही शोधाची आहे.

अंगणवाड्यांमधील बालकांची गैरसोयजिल्ह्यातील एकूण १३९0 अंगणवाड्यांमध्ये सद्यस्थितीत १ लाख ५ हजार ६७६ बालके आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या बालकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची सोय करण्यास शासनाची प्रचंड दिरंगाई होत आहे. 

पूरक पोषण आहाराचा वाया जाणारा खर्चअंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार वाटप योजनेतील पन्नास टक्के  खर्च काहींचे हित साधण्यासाठी केला जात आहे. त्याचा लेखाजोखा घेतल्यास राज्यातील सत्ताधारी आणि काही विरोधकांचे हात किती बरबटले आहेत, याचा पर्दाफाश होतो. पूरक पोषण आहाराच्या नावावर डल्ला मारणारांनी अंगणवाड्यातील ही समस्या निकाली काढण्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.