शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा ग्रामसेवक, सरपंचाविरुद्ध तक्रार

By admin | Updated: February 24, 2016 01:52 IST

ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामावर मनपा आयुक्तांची बैठक.

अकोला: महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती उभारल्या जात असून, सदर बांधकामे तातडीने न थांबवल्यास पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचा स्पष्ट इशारा मंगळवारी आयोजित बैठकीत तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांना मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिला. यावेळी काही ग्रामसेवकांनी अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची तयारी दर्शवली. मनपाच्या हद्दवाढीच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जून महिन्यापर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण होणार असून, मनपा क्षेत्रात शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश होईल. शासनाकडे विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल)चा प्रस्ताव विचाराधीन असून, निश्‍चितच चटई निर्देशांक (एफएसआय)मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्यडीसी रूलह्ण लागू होत नाही, तोपर्यंत इमारतींचे अवाजवी बांधकाम बंद करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी जारी केले आहेत. त्यानुसार शहरात व्यावसायिक तसेच रहिवासी इमारतींचे बांधकाम ठप्प पडून आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हद्दवाढ होईल या विचारातून बांधकाम व्यावसायिकांनी सदनिका (फ्लॅट) विकण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब आयुक्त लहाने यांच्या निदर्शनास आली. ग्रामपंचायत क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम तातडीने बंद करण्याच्या मुद्यावर मंगळवारी आयुक्तांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित ग्रामपंचायतचे तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांच्यासोबत बैठक आयोजित केली. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत उपस्थितांना इमारतींचे बांधकाम बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सदनिका, दुकानांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले असतील तरीही संबंधित तलाठी, ग्रामसेवक, सरपंचासह कंत्राटदाराविरोधात पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचे आयुक्त अजय लहाने यांनी यावेळी स्पष्ट केले.