शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

..तर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई

By admin | Updated: January 30, 2015 01:40 IST

प्रभारी अकोला मनपा उपायुक्तांचा इशारा

आशिष गावंडे/अकोला:मूलभूत सुविधा पुरविणे आणि महापालिका कर्मचार्‍यांच्या थकित वेतनासाठी प्रशासनाकडे बोट दाखविणार्‍या नगरसेवकांकडे मालमत्ता कर थकित आहे. त्यांनी जमा करावा, अन्यता मालमत्ता कर थकित ठेवणार्‍या नगसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा इशारा उपायुक्त माधुरी मडावी यांनी गुरुवारी दिला. मनपा क्षेत्रात १ लाख ३0 हजारांपेक्षा जास्त मालमत्ताधारक आहेत. यापैकी केवळ ४0 ते ४३ हजार मालमत्ताधारक मनपाकडे रीतसर कर जमा करतात. अर्थात उर्वरित मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे. एकीकडे प्रशासन मूलभूत सुविधा पुरवित नसल्याची सभागृहात ओरड करायची अन् दुसरीकडे प्रभागात पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना धाकदपट करायचा, अशी दुटप्पी भूमिका नगरसेवक घेतात. नागरिकसुद्धा अतिरिक्त पैसे जमा करावे लागतील, या विचारातून नगरसेवकांना मध्यस्थी करण्यास भाग पाडतात. या संपूर्ण प्रक्रियेमुळे करातून मिळणार्‍या मपाच्या उत्पन्नात फारशी वाढ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता, मालमत्ताकर जमा करण्याची सुरुवात नगरसेवकांकडून करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व नगरसेवकांना कर वेळेत भरण्याबाबत आवाहन केले जाणार आहे. वेळ पडल्यास सक्ती करण्याची तयारीही प्रशासाने केली आहे. नगरसेवकांकडून कर जमा केल्याचा आदर्श घेऊन सर्वसामान्य नागरिकही कर जमा करतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. मालमत्ताकराचा भरणा न करणार्‍या नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची कठोर भूमिका घेण्याचा इशारा उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिला आहे.