शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण!

By admin | Updated: March 23, 2017 02:41 IST

ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय या श्रेणीतील प्रथम पुरस्कार अकोट ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आला.

अकोला, दि. २२- आरोग्य विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, सवरेत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार आणि कायाकल्प पुरस्कारांचे वितरण बुधवारी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. येथील एका खासगी हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळय़ात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरखा अमानउल्ला खा, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार दिले जातात. यामध्ये यावर्षी ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय या श्रेणीतील प्रथम पुरस्कार अकोट ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम पुरस्कार हातरुण येथील प्रा. आ. केंद्र (२५ हजार रुपये), द्वितीय पुरस्कार धाबा प्रा. आ. केंद्र (१५ हजार रुपये) व तृतीय पुरस्कार कापशी प्रा. आ. केंद्र (१0 हजार रुपये) प्रदान करण्यात आला. उपकेंद्र श्रेणीत उमरा (१५ हजार रुपये), चरणगाव (१0 हजार रुपये), मोरगाव सादिजन (५ हजार रुपये) या उपकेंद्रांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. संचालन स्मीता जोशी व सचिन उनवणे, तर आभार प्रकाश गवळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत ठाकरे, डॉ. उत्पला देशभ्रतार, संजय सावळे, संदीप देशमुख, सचिन डांगे, भूषण सरोदे, नीलेश भिरड, राजू डहाणे, श्‍वेता मांडवडे यांनी परिश्रम घेतले. कायाकल्प पुरस्कार प्रदान या कार्यक्रमात कायाकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आले. हातरूण प्रा. आ. केंद्रास जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (दोन लाख रुपये), तर आगर व मळसूर येथील प्रा. आ. केंद्रांना प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५0 हजार रुपये देण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयाने विभागात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. खासगी डॉक्टरांचा सत्कार प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दर महिन्याला प्रा. आ. केंद्र स्तरावर शिबिर घेतले जातात. यामध्ये विनामूल्य सेवा देणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील १८ खासगी डॉक्टरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.