शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत फर्निचरची रेंज अकोल्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:04 IST

अकोला : पश्‍चिम विदर्भातील फर्निचर विक्रीचे मोठे केंद्र म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. सर्वसामान्य वर्गापासून तर उच्चभ्रू घरात लागणारे अद्ययावत े फर्निचर शहरातील  शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीसह सोफासेटला अधिक मागणी दरवर्षी राहते, ती अद्ययावत नव्या रेंजचे सोफासेट शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देदिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठ सज्ज सोफासेटला अधिक मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भातील फर्निचर विक्रीचे मोठे केंद्र म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. सर्वसामान्य वर्गापासून तर उच्चभ्रू घरात लागणारे अद्ययावत े फर्निचर शहरातील  शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीसह सोफासेटला अधिक मागणी दरवर्षी राहते, ती अद्ययावत नव्या रेंजचे सोफासेट शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.कधीकाळी लाकडी फर्निचरला मागणी असायची; मात्र गेल्या काही वर्षांपासून कुशनच्या फर्निचरने ही जागा घेतली आहे. फर्निचरच्या आत जर सागवान असेल तर चालेल; मात्र वरून आकर्षक कुशन असावे, हे अलीकडचे चलन आहे. ग्राहकाच्या आवडी-निवडी आणि मागणीनुसार आता बाजारपेठ सजू लागली आहे. लाकडी सोफासेट स्वस्त आणि कुशनचे सोफासेट महाग असे चित्र बाजारातील आहे. सोफासेट, बेड, दिवान, कपाट, ड्रेसिंग टेबल, स्टडी-ऑफिस टेबल, कॉम्प्युटर टेबल, डायनिंग टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, बंगोई, कॉर्नर टेबल, टी-टेबल, स्टुल आदी अद्ययावत स्वरूपाचे फर्निचर बाजारपेठेत दाखल आहे.

सर्वसामान्य अजूनही लोखंडी कपाटच घेतात..घरातील आंतरसजावटीनुसार जागेवर फर्निचर करण्याची प्रथा वाढत असली, तरी सर्वसामान्य ग्राहक अजूनही लोखंडी कपाटच खरेदी करताना दिसतो. दरवर्षी हजारो कपाट विकल्या जात असून, अजूनही अकोल्यात ही बाजारपेठ मोठी आहे. आठ हजारांपासून तर पंधरा हजारांपर्यंतचे कपाट बाजारात विक्रीसाठी आहे.

पीएलबीच्या फर्निचरकडे कल..दिसायला गुळगुळीत, चकाकी असल्याने अलीकडे ग्राहकांचा कल स्वस्त आणि आकर्षक दिसणार्‍या पीएलबी फर्निचरकडे झुकलेला आहे. पीएलबी फर्निचर टिकाऊ नसले, तरी ते सुंदर आणि सुबक असल्याने ग्राहकाच्या पसंतीस उतरते. ऊस आणि लाकडाच्या भुसा-चुरीवर रासायनिक प्रक्रिया करून पीएलबी फर्निचरची निर्मिती केली जाते. अलीकडे या फर्निचरला मागणी वाढली आहे.

नामांकित फर्निचरचे शोरूम्स४फर्निचरची मोठी रेंज शहरात असून, नामांकित मोठय़ा शोरूम्ससह लहान-मोठय़ा फर्निचर दुकानांची संख्या २५ च्या घरात आहे. पश्‍चिम विदर्भातील मोठे फर्निचर विक्री केंद्र म्हणून पुढे आलेल्या  अकोल्यातील नामांकित शोरूम्समध्ये नेक्सेस स्टोअर, तुलशान, एम.आर. फर्निचर, रौनक सेल्स, आहुजा, निधी, फोम हाउस, पेशव्यांचे फर्निचर, धनलक्ष्मी, स्वस्तिक, श्रीसाई, छाया, नीलेश यांचे नाव घेतले जाते.४सोफासेट १३ हजारांपासून ६0 हजारांपर्यंत आहेत. कॉर्नर सोफाच्या किमती त्याहून अधिक आहेत. पीएलबी मटेरियलच्या कपाटांची रेंज आठ हजारांपासून १८ हजारांपर्यंत आहे. एलडी टीव्ही सेटचे फर्निचर  साडेचार हजारांपासून साडेसहा हजारांपर्यंत आहेत. बेडच्या किमती १९ हजारांपासून ४0 हजारांपर्यंत आहेत. डायनिंग टेबल चार हजारांपासून, तर २५ हजारांपर्यंत आहेत. ड्रेसिंग टेबल १७ हजारांपासून तर ७0 हजारांपर्यंत आहेत. टी-टेबल अठराशे रुपयांपासून तर २0 हजारांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

दिवाळीच्या निमित्ताने नवीन रेंजच्या सोफासेट आणि डायनिंगला मागणी असते. मागणी तसा पुरवठा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. दिवाळीच्या निमित्ताने तेजी येत असून, ग्राहकांची गर्दी दरवर्षीप्रमाणे होईल, ही अपेक्षा आहे.-अशोक आहुजा, संचालक, ग्लोबल फर्निचर अकोला