शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

५२ उमेदवारांच्या यादीला आंबेडकरांचा ‘ग्रीन सिग्नल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 23:39 IST

अ‍ॅड. आंबेडकर यांनी सुचविल्यानुसार पक्षाच्या ५२ उमेदवारांची अद्ययावत यादी निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून पक्षाच्या मुंबई कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

अकोला: महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघ निवडणूक निरीक्षक उपसमितीने इच्छुक उमेदवारांची यादी सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सादर केली असून, उपसमितीने तयार केलेल्या ५२ उमेदवारांच्या यादीला अ‍ॅड. आंबेडकर यांनी ह्यग्रीन सिग्नलह्ण दिला आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी भारिप-बमसंने सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या नावांमधून प्रभागनिहाय उमेदवार भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून निश्चित करण्यात येत आहेत. त्यामध्ये २२ मुस्लीम उमेदवार आणि ३० अनुसूचित जाती व ओबीसी उमेदवार, अशी ५२ उमेदवारांची यादी उपसमितीकडून निश्चित करण्यात आली आहे. पक्षाचे निवडणूक निरीक्षक उपसमितीचे प्रमुख बालमुकुंद भिरड आणि उपसमितीचे सदस्य तथा माजी आमदार हरिदास भदे यांनी सोमवारी दुपारी मुंबई येथे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन, उपसमितीने निश्चित केली उमेदवारांची यादी सादर केली. यादीवर चर्चा केल्यानंतर काही किरकोळ बदल सुचवित, अ‍ॅड. आंबेडकर यांनी पक्षाच्या ५२ उमेदवारांच्या यादीला हिरवी झेंडी दाखविली. पक्षाचे इतर १० उमेदवार दोन-तीन दिवसात निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून निश्चित करण्यात येणार आहेत.