शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांनी घेतल्या ‘कॉर्नर’ बैठका!

By admin | Updated: February 11, 2017 02:27 IST

पदाधिका-यांची बैठक; जाहीर सभांचे केले नियोजन

अकोला, दि. १0- महानगरपालिका निवडणूक रिंगणातील भारिप बहुजन महासंघ उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी शहरातील विविध भागात ह्यकॉर्नरह्ण बैठका घेऊन कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. भारिप-बमसंचे ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर शुक्रवारी अकोला दौर्‍यावर आले होते. पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील हमजा प्लॉट, मोठी उमरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. तसेच अकोट फैल, खरप व लहान उमरी भागात कॉर्नर बैठका घेऊन, अँड. आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. तसेच मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकार्‍यांसह निवडणूक निरीक्षक उपसमितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन, पक्षाकडून करण्यात आलेल्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण,भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीप्रमुख बालमुकुंद भिरड, समिती सदस्य माजी आमदार हरिदास भदे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, आसीफखान, डॉ. प्रसन्नजित गवई, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांच्यासह पक्षाचे जिल्हा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.