शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

हौशी मराठी नाट्य स्पर्धा : कुप्रथेचे ‘काली’ मधून वास्तवात दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:10 IST

अकोला : आजच्या विज्ञानवादी युगातही देशामध्ये कुप्रथाचे वर्चस्व कायम आहे. कुप्रथेची साखळी तुटता तुटत नाही. कन्या भ्रूणहत्या आजही या ...

अकोला: आजच्या विज्ञानवादी युगातही देशामध्ये कुप्रथाचे वर्चस्व कायम आहे. कुप्रथेची साखळी तुटता तुटत नाही. कन्या भ्रूणहत्या आजही या देशात अजूनही होत असल्याचे वास्तवात दर्शन ‘काली’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. सत्यघटनेवर आधारित ‘काली’ नाटक सोमवारी ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत पत्रकार कॉलनी नवयुवक क्रीडा प्रसारक बहूद्देशीय संस्था, अकोलाच्या वतीने सादर करण्यात आले.समाजात आजही स्त्रियांवर अन्याय होत आहे. जी बंड करू न उठते, अशा स्त्रीला समाज अधिकच त्रास देत असतो. नाटकातील स्त्री पात्रालादेखील समाजातील गुंड प्रवृत्तीचा माणूस त्रास देत असतो. तो माणूस त्या स्त्रीला असा विश्वास देतो की, तिच्यावर खूप अन्याय होत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून ती स्त्रीदेखील अनेक मुलींचे जीव घेते. पुढे ही स्त्री मरण पावते; मात्र ही कुप्रथा थांबत नाही. त्या गुंडप्रवृत्तीच्या माणसाचे शागीर्द परत दुसरी स्त्री वाईट कामे करण्यास तयार करतात. परत कुप्रथेची दुसरी फळी तयार होते, असे ‘काली’ या नाटकातून दाखविण्यात आले. गावावर ‘काली’चा कोप होऊ नये, यासाठी अनेक निष्पाप बळी दिल्या जातात. या कथित कालीचा गावात मोठा दरबार भरविल्या जातो. या कालीवर गावकऱ्यांची श्रध्दा असते. तिच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असतात. भक्त, त्यांचे प्रश्न, समस्या, मनोकामना काली समोर मांडतात, काली यामधून लोकांना मार्ग दाखवित असते.नाटकामध्ये कालीची भूमिका राजश्री बोन्ते हिने केली. संध्याचे पात्र अभिलाषा गोळे हिने साकारले. ताईजीची भूमिका शुभांगी पाटील यांनी रंगविली. रघू- उदयकुमार दाभाडे, बबन- अनिमेश देशमुख, छगन- आशिष कांबळे, पागल- श्रृती सोनकुसरे, महिला एक- राधिका भालेराव, बन्सी-अमित आठवले, पोलीस एक- नीलेश गाडगे, हिशेबनीस व शेतकरी भक्त- विशाल गायगोल, माणूस एक- अनुप मानकर, भक्त २ आनंद दांडगे, महिला दोन-उत्तरा पुरकर, मुलगी- गौरी पुरकर, पोलीस दोन- महेंद्र घ्यारे, कार्यकर्ता- अक्षय पिंपळकर, म्हाताºयाची भूमिका गोविंद उमाळे यांनी केली. नाटकाला प्रकाश योजना दीपक नांदगावकर, नेपथ्य गोविंद उमाळे, पार्श्वसंगीत अभिषेक अंबुसकर, वेशभूषा अक्षय पिंपळकर, रंगभूषा महेश इंगळे यांची होती. नाटकाचे लेखन सचिन गिरी यांचे, तर दिग्दर्शन उदयकुमार दाभाडे यांचे लाभले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक