शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

स्थगिती असली तरी, गय नाहीच!

By admin | Updated: July 12, 2014 01:53 IST

अकोला मनपा प्रशासन अतिक्रमकांना बजावणार नोटीस

अकोला : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विपीनकुमार शर्मा यांनी रस्त्यालगत पक्की दुकाने उभारणार्‍या अतिक्रमकांची दुकाने भुईसपाट केली होती. अशा व्यावसायिकांनी न्यायालयातून तात्पुरता स्थगनादेश मिळवत पुन्हा नव्याने दुकानांचे बांधकाम केले. हा प्रकार म्हणजे न्यायालयाच्या स्थगनादेशाचा अवमान असून, अशा अतिक्रमणधारकांना मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे.मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यानुसार प्रमुख मार्गावरील अनेक अतिक्रमित पक्की दुकाने भुईसपाट केली जात आहेत. ज्या मार्गावरील अतिक्रमण दूर होत आहे, त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण, पेव्हर ब्लॉक व वृक्ष लागवड करण्याचा आराखडा प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सवरेपचार रुग्णालयासह टॉवर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमणधारकांनी पक्की दुकाने उभारली. यासह शहराच्या विविध भागात महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याची परिस्थिती आहे. या संबंधित अतिक्रमकांना हुसकावण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला स्थानिक न्यायालयातून मिळविलेला तात्पुरता स्थगनादेश दाखवल्या जात आहे. अशा स्थगनादेश मिळवलेल्या अतिक्रमकांची दुकाने अद्यापही कायम आहेत. सार्वजनिक आवार भिंतीलगत पक्की दुकाने उभारणार्‍या व्यावसायिकांनी न्यायालयाचा तात्पुरता मनाई हुकूम दाखवल्याने मनपाला माघारी फिरावे लागले होते. यावर ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकताच, मनपाचा विधी विभाग खळबळून जागा झाला. यासंदर्भात न्यायालयातून स्थगनादेश मिळवलेल्या २४ अतिक्रमकांना नोटीस दिल्या जाईल. आयुक्तांसमोर होणार्‍या सुनावणीदरम्यान अतिक्रमकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे अतिक्रमण करणार्‍यांची यापुढे गय करण्यात येणार नाही हे दिसून येते.