अकोला : होमगार्ड कार्यालयाजवळ राहणार्या व्यापार्याला दिलेले ५0 लाख रुपयांचे चक्रीव्याज दराने १ कोटी २0 लाख रुपयांची मागणी करून आणि त्याला मारहाण करणारा आरोपी अल्लू पहेलवान ऊर्फ अलियार खान याच्या भांडपुरा येथील घराची कोतवाली पोलिसांनी रविवारी दुपारी झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना विविध प्रकारचे महत्त्वाचे १0३ दस्तऐवज, मुद्रांक आणि तेवढेच छायांकित प्रतीही मिळून आल्या. पोलिसांनी हे दस्तऐवज जप्त केले. अटकेच्या भीतीने आरो पी फरार झाले आहेत. शहरातील व्यापारी मोहम्मद जाफर कादर यांनी शुक्रवारी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार त्याने व त्याच्या सहकार्याने अल्लू पहेलवान याच्याकडून जानेवारी २0१३ मध्ये व्याजाने ५0 लाख रुपये घेतले होते. व्याजाची टक्केवारीही ठरली होती. त्यापैकी ४५ लाख रुपयांची रोख व्यापार्याने आरोपीला दिली हो ती. त्यानंतर आरोपीने व्यापार्याला ५0 लाख रुपयांचे चक्रीवाढ दराने व्याज लावून त्याला १ कोटी २0 लाख रुपये देण्याची मागणी अलियार खान ऊर्फ अल्लू पहेलवान, फिरोज खान, जावेद खान, बुढन उर्फ नियामत खान, आझाद खान, मिया खान आणि गजानन कांबळे यांनी केली होती. को तवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३ , ४५२, ३२३ , ३८७ , ३२, एबी व ३३ सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी रविवारी अल्लू पहेलवानच्या घरी छापा घातला आणि घराची झडती घेतली. झडतीदरम्यान शेकडो महत्त्वाचे कागदपत्रे मिळून आली.
अल्लू पहेलवानच्या घराची पोलिसांकडून झडती
By admin | Updated: September 29, 2014 02:34 IST