शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह अनुदान वाटप; जबाबदारी ठरणार!

By admin | Updated: November 4, 2016 02:25 IST

अतिरिक्त सीईओ करणार ‘शो कॉज’च्या स्पष्टीकरणाची तपासणी.

अकोला, दि. ३- समाजकल्याण विभागातून १४ वसतिगृहांना नियमबाहय़पणे वाटप केलेल्या निधीबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी खिल्लारे यांच्यासह कर्मचार्‍यांची जबाबदारी निश्‍चित केली जात आहे. त्यांच्या स्पष्टीकरणाची फाइल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे. समाजकल्याण विभागातून ऑक्टोबरच्या सुरुवातीला १४ वसतिगृहांना लाखोंचे अनुदान देण्यात आले. ते देताना शासन निर्णय, आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अंधारात ठेवत अनुदान वाटप करण्यात आले. तर कार्यालयीन प्रक्रियेतही मोठय़ा प्रमाणात अनियमितता केल्याचे उघड झाले. त्यासाठी जबाबदार असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, प्रभारी समाजकल्याण अधिकारी व्ही.के. खिल्लारे, सहायक लेखाधिकारी आर.एम. थोरात, अधीक्षक खारोडे, कनिष्ठ सहायक हिंगणे यांना कारणे दाखवा नोटीस २४ ऑक्टोबर रोजी बजावण्यात आली. त्याचे स्पष्टीकरण सर्व संबंधितांनी सादर केले आहे. अनुदान वाटप करताना नेमके काय घडले, कुणाची काय जबाबदारी होती. त्यांनी ती पार पाडली की नाही, ही सर्व मुद्दे विचारात घेऊन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुकाअ विधळे यांनी दिले. वसतिगृह तपासणीचे स्वतंत्र अहवाल मागवले!वसतिगृह अनुदान वाटपात झालेल्या घोळाची पडताळणी करण्यासाठी गेल्या २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एकाचवेळी जिल्हय़ातील ५१ वसतिगृहांत अधिकार्‍यांच्या पथकांनी धाव घेत तपासणी केली. त्या तपासणीत स्पष्ट झालेल्या मुद्यांचा अहवाल वसतिगृहांच्या स्वतंत्र फायलीसह सादर करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी समाजकल्याण अधिकारी शरद चव्हाण यांना बुधवारी दिले. अनुदान वाटपात झालेल्या अनियमिततेला जबाबदार असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई निश्‍चित होईल. अधिकारी दोषी असतील, तर त्यांच्या विभागाकडे कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाईल. - अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.