शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ठाणेदारासह पाचही पोलीस निलंबित

By admin | Updated: August 1, 2016 01:19 IST

रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्याकडून साडेसहा हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण.

अकोला : रेल्वे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या फेरीवाल्याकडून साडेसहा हजार रुपयांची लाच घेणार्‍या अकोला जीआरपीचे ठाणेदार तथा साहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखडे, पोलीस कर्मचारी गौतम शिरसाट, शरद जुनघरे, सतीश चव्हाण आणि सुनील कडू या पाचही लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर जीआरपीचे पोलीस अधीक्षक यांनी रविवारी तडकाफडकी या पाचही लाचखोरांच्या निलंबनाचा आदेश अकोला जीआरपीला पाठविला आहे.रेल्वे स्टेशन परिसरात तसेच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या फेरीवाल्यास खाद्यपदार्थांची विक्री करावयाची असेल, तर दर महिन्याला साडेसहा हजार रुपयांचा हप्ता आणि कारवाई टाळण्यासाठी अकोला जीआरपीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे, जीआरपी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गौतम हरिभाऊ शिरसाट, शरद बाळाभाऊ जुनघरे, सतीश जसवंतसिंह चव्हाण आणि सुनील लक्ष्मण कडू या पाच लाचखोरांनी फेरीवाल्यास साडेसहा हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी दिवसभर फेरीवाल्याकडे तगादा लावून रक्कम देण्यास त्याला बाध्य केले. त्यानंतर शुक्रवारी जीआरपीच्या पोलीस अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांचा हा प्रताप सुरूच असल्याने फेरीवाल्याने या प्रकाराची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख उत्तम जाधव यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून साहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखडे, गौतम शिरसाट, शरद जुनघरे, सतीश चव्हाण आणि सुनील कडू या पाच लाचखोर पोलिसांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून शनिवारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच रविवारी नागपूर जीआरपीच्या पोलीस अधीक्षकांनी या पाचही लाचखोरांना निलंबित केल्याचा आदेश अकोला जीआरपीला पाठविला. जीआरपी पोलीस स्टेशनचे सर्वेसर्वा असल्याच्या तोर्‍यात या पाचही पोलिसांनी अनेक फेरीवाल्यांना पैशासाठी प्रचंड वेठीस धरल्याच्या तक्रारी आता नागपूर जीआरपीकडे गेल्या असून, या पाचही लाचखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.