शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालवाडीचे वर्ग सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय गटनेता एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:07 IST

अकोला : महापालिकेच्या शाळेत अंगणवाडी सुरू क रण्याचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्यानंतर मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग नव्याने ...

अकोला: महापालिकेच्या शाळेत अंगणवाडी सुरू क रण्याचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्यानंतर मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग नव्याने सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सर्वपक्षीय गटनेता एकवटल्याचे चित्र समोर आले. खुद्द सत्तापक्ष भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघाच्या गटनेत्यांनी तसेच उपमहापौर वैशाली शेळके यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून येत्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.शहरातील गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील महागडे शिक्षण घेणे परवडत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करण्यासोबतच त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी ३३ सेविका व ३३ मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती केली होती. २०१७ मध्ये सुरू झालेल्या बालवाडीच्या वर्गांना सर्वसामान्य अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. २०१८ मध्ये संबंधित सेविका, मदतनीस यांना मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक मनपा शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळेत स्थानांतरण करण्याचे निर्देश बालविकास विभागाच्या आयुक्तांनी दिले. त्यानुषंगाने बालविकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार असल्याचे समोर आले. मनपाच्या संपूर्ण ३३ शाळांमध्ये अंगणवाडी सुरू होणार असल्याची मनपा प्रशासनाला अपेक्षा असल्याने बालवाडीच्या वर्गांवरील सेविका व मदतनीस यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी, आपसूकच बालवाडीचे वर्ग बंद झाले. त्यानंतर अंगणवाडीच्या प्रस्तावाला खीळ बसली. त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले असता, या मुद्यावर सर्वपक्षीय गटनेता एकवटल्याचे दिसून आले.

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा!उपमहापौर वैशाली शेळके, भाजपाचे गटनेता राहुल देशमुख, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी मनपाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. आयुक्त संजय कापडणीस यांनी सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सकारात्मक विचार करावा, असे पत्राद्वारे नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका