शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत केली वृद्धाची निर्घृण हत्या!

By admin | Updated: April 20, 2017 01:32 IST

अकोला : वृद्धासोबत कोणताही वाद नसताना, निष्कारण मद्यपी युवकाने ६५ वर्षीय गणपत फकीरसा डगवाळे यांच्यावर कुदळ व फावड्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

आरोपी युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचा: शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

अकोला : वृद्धासोबत कोणताही वाद नसताना, निष्कारण मद्यपी युवकाने ६५ वर्षीय गणपत फकीरसा डगवाळे यांच्यावर कुदळ व फावड्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपी अमोल ज्ञानेश्वर बिल्लेवार (२२ रा. जवळा बु.) हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून, तो दारूच्या नशेत अनेकांसोबत वाद घालून त्यांना मारहाण करीत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी होत्या. दारूच्या नशेतच त्याने गणपत डगवाळे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपी अमोल याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बोरगाव खुर्द येथील कैलास डगवाळे (४५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील गणपत डगवाळे हे जवळा येथील शेतशिवारामध्ये रमेशलाल राधाकिसन चौधरी यांच्या शेतात रखवालीचे काम करीत. सोमवारी रात्री ९ वाजता सुमारास आरोपी अमोल बिल्लेवार हा दारूच्या नशेत शेतात गेला. या ठिकाणी रखवालदार गणपत डगवाळे यांच्याकडे गेल्यावर आरोपीने त्यांना प्यायला पाणी मागितले; परंतु आरोपी हा दारूच्या नशेत धुंद असल्याचे पाहून गणपत डगवाळे यांनी त्यास पाणी देण्यास नकार दिला. यावरून अमोलने त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांच्या छातीवर, डोक्यावर आणि डोळ्यावर कुदळ व फावड्याने जबर प्रहार केले. या मारहाणीत गणपत डगवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला; परंतु त्याला शेताकडे जाताना काही साक्षीदारांनी बघितले होते. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोल बिल्लेवार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्या केल्याचे कबूल केले. त्याला नवव्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. नन्नावरे यांच्या न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ एम.के. ठोसर यांनी, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. केशव एच. गिरी यांनी बाजू मांडली.